सैनिक महिला बचत गटांना अर्ज करण्याचे आवाहन*
: 22 नोव्हेंबर, 2022
*सैनिक महिला बचत गटांना अर्ज करण्याचे आवाहन*
*नाशिक, दिनांक 22 नोव्हेंबर, 2022 (जि.मा.का. वृत्तसेवा):*
माजी सैनिक विश्रामगृह नाशिक येथे माजी सैनिकांचे विविध कागदपत्रे तयार करण्यासाठी ईच्छुक सैनिक महिला बचत गटांनी 05 डिसेंबर 2022 पर्यंत सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर ओंकार कापले यांनी केले आहे.
सैनिक महिला बचत गट ज्यामध्ये सैनिक वीरपत्नी, माता व पिता यांचा समावेश अभिप्रेत आहे. माजी सैनिकांचे आर्थिक मदतीचे ऑनलाईन फॉर्म भरणे, प्रतिज्ञापत्र बनविणे व अनुषंगिक कामे माफक दरात करण्यासाठी बचतगट इच्छूक असावा. बचतगटांनी सदर अर्ज जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सैनिक कल्याण मंडळ यांचे नावे जिल्हा सैनिक कार्यालय, नाशिक येथे विहित मुदतीत सादर करावे, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.