नाशिकची गोदावरी तुडुंब. एकोणावीस सप्टेंबर नंतर पाऊस उघडण्याची शक्यता.
नाशिक जनमत चंद्रकांत धात्रक यांच्याकडून राज्यात गेल्या आठ दिवसापासून संत धार पाऊस चालू असून नागरिक त्रस्त झाले आहे . दोन दिवसापासून कोकण आणि विदर्भात जोरदार पाऊस होत आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पालघर डहाणू इत्यादी भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस चालू आहे त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा वीसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आलेला आहे गंगापूर धरण जलसंपदाच्या नियमानुसार साधारण 95 ते 97 टक्केभरले की धरणात पाणीसाठा ठेवून उर्वरित पाणी नदीमध्ये सोडण्यात आलेले आहे असेच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणांची आहे सर्वच धरणे पूल भरले असून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी धरणांमधून सोडण्यात येत आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित रहावे आज देखील सकाळपासून जोरदार पावसाची बॅटिंग नाशिक व त्र्यंबकेश्वर मध्ये चालू आहे अति पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे हाती आलेला घास निसर्गाच्या अति पावसामुळे पिके खराब होण्याची भीती निर्माण झालेली आहे अनेक शेतामधून नितळ गार पाणी वाहत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये अति पावसामुळे
राज्यामध्ये अनेक जण पुरात वाहून गेल्याने तर अनेक जणांना इलेक्ट्रिक शॉक लागल्याने मृत्यू देखील झालेला आहे येणाऱ्या दोन-तीन दिवस नागरिकांनी काळजी घेणे जरुरीचे आहे नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे व सावध राहावे अति पावसाला नाशिक शहरातील अनेक नागरिक कंटाळले असून शहरातील रस्ते खड्डेमय झालेले आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आलेले होते त्यामुळे चिखल रस्त्यावर झालेला आहे वाणी चालवताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. यावर्षी चौथ्यांदा गंगापूर धरणातून पाणी सोडल्याने नाशिककरांना गंगेचा महापुर चौथ्यांदा बघता आला आहे गुजरात मध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचे प्रमाण वाढले आहे लवकरच नवरात्र उत्सव चालू होत असून आता तरी पावसाने उघडीत द्यावी असे भाविक बोलत आहे.