ब्रेकिंग
शासकीय विभागीय ग्रंथालयात दिवाळी अंकाचे प्रदर्शन.

नाशिक जनमत दिनांक: 11 नोव्हेंबर, 2022
*शासकीय विभागीय ग्रंथालयात दिवाळी अंकाचे प्रदर्शन*
*नाशिक, दिनांक 11 नोव्हेंबर, 2022 (जिमाका वृत्तसेवा):* शासकीय विभागीय ग्रंथालय, नाशिकरोड येथे तीन दिवसीय दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन आज शनिवार दि.12 नोव्हेंबर सकाळी 10.30 ते दुपारी 5.00 वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
प्रदर्शनात विविध दर्जेदार दिवाळी अंक ठेवण्यात आले असून, ग्रंथालयाचे वर्गणीदार सभासद तसेच वाचकांना दिवाळी अंक ग्रंथालयात बसून वाचता येणार आहेत. वाचक प्रेमी व सभासद यांनी दिवाळी अंक वाचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या ग्रंथपाल कविता महाजन यांनी केले आहे.