ब्रेकिंग

डॉ रजनी राव यांची विक्रीमी झेप. द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस कडून विश्वविक्रमी सन्मान प्रदान.

*डॉ.रजनी राव यांची विक्रमी झेप, द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून विश्वविक्रमी सन्मान प्रदान*

 

*नाशिक (दि. 27 जुलै)* प्रतिनिधी : शिक्षणक्षेत्रात काम करत असताना साक्षरता व निरक्षरता हे दोन शब्द नेहमीच कानावर पडत असतात. त्यापैकी साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी अनेक शिक्षणतज्ञ नेहमीच प्रयत्नशील असतात. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कार्यक्षम शिक्षणपद्धती रुजविण्यासाठी कार्यरत असलेल्या म्हैसूरच्या शिक्षणतज्ञ व संशोधक डॉ.रजनी राव यांच्या आधुनिक फोनिक मेथोडोलॉजीची सध्या चर्चा आहे. पारंपारिक फोनिक मेथोडोलॉजी बाजूला सारून त्यांनी सध्या संशोधन केलेली ‘कोडींग फोनिक्स’ ही लर्नालॉजिमधील सर्वात सोपी जलद आणि सोपी फोनिक मेथोडोलॉजि आहे असा त्यांचा पीएचडी चा प्रबंध नुकताच इंटरनॅशनल इंटरशिप युनिव्हर्सिटी ने मान्य केला असून त्यांना याबाबत ‘मानद डॉक्टरेट’ प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्सने’ घेतली आहे.

 

🔰कोण आहेत डॉ.रजनी राव ? जाणून घेऊया त्यांच्याबद्दल

🟢आंतरराष्ट्रीय भाषा तज्ञ, Lead Gen Academy या शैक्षणिक संस्थेच्या प्रमुख

🟢लॉकडाऊनच्या काळात जगभरातील ८ देशातील १५०० पेक्षा जास्त विद्यार्थांना लॉकडाऊनच्या काळात कोडींग फोनिक्सचे धडे, तसेच शिक्षक लोकांना हि प्रशिक्षण देणाऱ्या ट्रेनर

🟢शिक्षण क्षेत्रातला एकूण ११ वर्षाचा अनुभव, व आजवर हजारो विद्यार्थी, ट्रेनर, प्रशिक्षक यांना प्रशिक्षित केले.

🟢अनेक नामांकित पुरस्काराने विभूषित

🟢इंटरनॅशनल इंटरशिप युनिव्हर्सिटी (IIU) कडून आधुनिक कोडींग फोनिक्सबद्दल मानद डी.लिट पदवी प्रदान

🟢आता ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये संशोधनाबद्दल विक्रमी नोंद’

 

🟠कोडींग फोनिक्सबद्दल…

प्री-प्रायमरी च्या तसेच लहान मुलांना अक्षरे ओळख करून देण्यासाठी शिक्षक लोक एक विशिष्ठ पध्दती वापरतात. यामध्ये ध्वनी, अक्षरे, गोष्टी च्या माध्यमातून मुलांना अक्षर ओळख होत असते. डॉ.रजनी राव यांच्या कोडींग फोनिक्स मेथोडोलॉजीमध्ये २६ इंग्रजी अक्षरांचे ध्वनी, ६५ दीर्घ आणि मिश्र स्वर, २५ सामान्य कोडींग फोनिक्स नियम आदींचा समावेश आहे. याद्वारे कोणते हि लहान मुल वाचन कौशल्य लवकर आत्मसात करू शकते, असा त्यांचा विश्वास आहे.

 

‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ हि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी ऑर्गनायझेशन आहे. यामध्ये विविध क्षेत्रात गुणवत्ता व भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तींची नोंद होत असते. डॉ रजनी राव यांच्या सदर रेकॉर्डचे बाबतीत ‘आयई सेंटर’ या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थेचे प्रमुख व विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांनी ज्युरी मेम्बर म्हणून काम पाहिले. डॉ.रजनी राव यांच्या या यशासाठी समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे