जातेगाव येथे संविधान दिन आणि फुले पुण्यतिथीनिमित्त महापुरुषांना अभिवादन.
जातेगाव येथे संविधान दिन आणि फुले पुण्यतिथीनिमित्त महापुरुषांना अभिवादन
अरुण हिंगमीरे
जातेगांव, नांदगाव
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे अवचित्य साधून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुतळ्यास आणि ग्रामपालिका जातेगाव येथे पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे दिनांक 28 नोव्हेंबर सोमवारी शिक्षण सम्राट क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या ग्रामस्थांनी पुतळ्यास ग्रामपालीकेच्या वतीने, प्राथमिक शाळेत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जातेगांव तसेच श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित साईज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि प्राथमिक शाळा विद्यालय मौजे वसंतनगर आणि चंदणपुरी येथे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आणि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच शोभाताई पवार, उपसरपंच पंढरीनाथ वर्पे, सदस्य बाळासाहेब लाठे, संदिप पवार, रामदास पाटील तसेच सर्व महिला सदस्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, श्री. संत सेवालाल महाराज संस्थेचे अध्यक्ष एस.जी. राठोड, जनता विद्यालयाचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अर्जुन पाटील, विकास सोसायटीचे अध्यक्ष अंकुश पगारे, संचालक नाना थोरात, धनंजय जानराव,
बाबुभाई शेख यांच्यासह सर्व संचालक, काँग्रेसचे अयूब शेख, आप्पा त्रिभुवन, संतोष गायकवाड, गुलाब, पाटील, सुभाष पवार, शंकर लाठे, राजु शेख, समाधान कासार, सुरेष जाधव, मधुकर निंबारे सागर पगारे यांच्यासह नागरिक सर्व शैक्षणिक संस्थेचे शिक्षक शिक्षेतर कर्मचारी हे उपस्थित होते.