वसंतराव नाईक शिक्षण संस्था पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज निफाड विभागात डोंगर गावचे प्रगतशील शेतकरी गोविंद मुरलीधर नागरे यांनी पंढरीनाथ थोरे यांच्या पॅनल मधून.भरला फॉर्म. .
नाशिक जनमत. प्रतिनिधी. वसंतराव नाईक शिक्षण संस्था नाशिकच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज निफाड विभागात डोंगर गावचे प्रगतशिल शेतकरी गोविंद मुरलीधर नागरे यांनी पंढरीनाथ थोरे यांच्या पॅनल मधून. फॉर्म भरला. यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र तसेच सहकारी व संस्थेचे अनेक सदस्य उपस्थित होते डोंगरगाव येथील राहणारे गोविंदराव नागरे यांनी डोंगरगाव सोसायटीचे चेअरमन पद तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्राहक भांडार चे संचालक खरेदी विक्री संघाचे लासलगाव संचालक. इत्यादी पदे भूषवलेले आहेत
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा फोन नंबर 9273020944 9834767771
सामाजिक कार्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांची धडपड नेहमी असते. वसंतराव नाईक शिक्षण संस्थे मध्ये असलेल्या अनेक सभासदांच्या आग्रहास्तव त्यांनी आज फॉर्म भरला त्यांच्या समवेत गोरख भाऊ नागरे कांतीलाल भाऊ नागरे वाल्मीक आव्हाड राख. साहेब अर्जुन नागरे काशिनाथ साबळे विश्वनाथ सानप नारायण मापारी व इत्यादी अनेक जण उपस्थित होते. यावर्षी वसंतराव नाईक शिक्षण संस्थेमध्ये आत्तापर्यंत 453 फॉर्म भरले आहेत तसेच चार पॅनल उभे राहण्याची दाट शक्यता आहे 27 तारखेस ही निवडणूक होत असून निवडणूक रंगतदार होणार आहे उद्या फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असून उद्या चार वाजता फॉर्म भरण्याची मुदत संपणार आहे दरम्यान निफाड विभागामध्ये श्री गोविंद मुरलीधर नागरे यांनी फॉर्म भरल्याने सभासदांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे लवकर प्रचाराचा ते नारळ फोडणार आहे. पंढरीनाथ थोरे यांचाच पॅनल विजय होईल अशी त्यांना खात्री आहे.