ब्रेकिंग
दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज.
नाशिक जनमत राज्यात दोन दिवस विजाच्या कडकड्यासह जोरदार पावसाची शक्यता असून चार ऑक्टोबर पर्यंत विविध भागात पावसाचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तिवलेला आहे दरम्यान नाशिकला गुरुवारी पावसाने जोडपून काढल्याने नवरात्र उत्सवामध्ये नागरिकांची धेद्रापट उडाली मान्सूनचा प्ररतीचा प्रवास सुरू असून आतापर्यंत संपूर्ण पंजाब चंदिगड काश्मीर दिल्ली हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश व हरणाचा पश्चिम भाग तसेच राजस्थानमधील बहुतांश भागातून माघार घेतली आहे गुरुवारी पुणे नाशिक सोलापूर मुंबई जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते परतीच्या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असून अनेकांची ऑक्टोबर छाटणी लाबली ली दिसत आहे अनेक भागांमध्ये शेतकरी वर्ग बाजरी सोयाबीन उडीद ही पिके काढत आहे तसेच काही ठिकाणी कांद्याची लागवड देखील चालू आहे अचानक येणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात धावपळ होऊन हाल होत आहे अनेक ठिकाणी शेतीमाल ओला होत असून नुकसान होत आहे दरम्यान अजूनही दोन दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो असा हवामानाचा अंदाज आहे