आमदार सुहास कांदे यांच्यातर्फे पूरग्रस्त कुटुंबियांना अन्नधान्याची व संसार उपयोगी वस्तूची मदत.
*आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्यातर्फे पूरग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्याची व संसार उपयोगी वस्तूंची मदत*
नाशिक जनमत प्रतिनिधी समाधान सोमासे. यांच्याकडून मनमाड शहरामध्ये रविवारी रात्री
झालेल्या अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे शहरातील रामगुळणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि यामुळे अनेक नदीकाठच्या कुटुंबांना स्थलांतरित व्हावी लागले तरीही यामध्ये त्यांचे संसार संपूर्णतः वाहून गेला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अनेकांच्या घरात पाणी गेले यासह अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. ही सर्व परिस्थिती समजताच नांदगाव तालुक्याचे लाडके सन्माननीय आमदार सुहास (आण्णा) कांदे व सौ.अंजुमताई कांदे यांनी त्वरित पूरग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली व पूरग्रस्तांना धीर दिला. परिस्थिती पाहता आमदार सुहास (आण्णा) कांदे यांनी त्वरित प्रत्येक पूर परिस्थितीला बळी ठरलेल्या कुटुंबीयांना अन्नधान्य किराणा वस्तूच्या वाटपासाठी सूचना केल्या. यानुसार आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मनमाड येथे प्रत्येक पुरग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य किराणा किट वाटपचे करण्यात आले ज्यांचे नुकसान या परिस्थितीमध्ये झाले आहे. याप्रसंगी सौ.अंजुमताई कांदे यांनी स्वतःउपस्थित राहून या सर्व पूरग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्याचे किट दिले. या किट मध्ये जिवनावश्यक किराणा वस्तूंचा समावेश आहे.
शिवसेना मनमाड शहर कोअर कमिटीचे सदस्य राजाभाऊ भाबड, वाल्मीक आंधळे, सुभाष माळवतकर, आमिन पटेल, बाळा सांगळे, योगेश इमले, इरफान मोमीन, भुषण दरगुडे, लोकेश साबळे, विकास (पिंटू) वाघ, महेंद्र गरुड, सुनील ताठे, आसिफ शेख, जाफर मिर्झा, ललित रसाळ, सचिन दरगुडे, अजिंक्य साळी, सिद्धार्थ छाजेड, कृष्णा जगताप, लाला नागरे, कलश पाटेकर, गणेश मिसर, कुणाल विसापूरकर, तसेच शिवसैनिक स्वराज वाघ, गौरव थोरात नंदु पिठे तसेच शिवसेना महीला आघाडीच्या उज्वलाताई खाडे, संगीताताई बागुल, विद्याताई जगताप, रोहिणीताई मोरे, पुजाताई छाजेड, दिक्षाताई झाल्टे उपस्थित होते.जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क साधा ९२७३०२०९४४ चंद्रकांत धात्रक