ब्रेकिंग
चाळीसगाव तालुक्यातील नाव्हें येथे शेतात बाप लेकाचा वीज पडून मृत्यू. परिसर शोक मग्न.
नाशिक जनमत महाराष्ट्र मध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे आज दुपारी चाळीसगाव तालुक्यात नावे येथे मुलगा आणि वडील शेतात खत देण्याचे काम करत असताना अचानक जोरदार पाऊस चालू झाला त्यात वीज पडून मुलगा व वडील दोघेही ठार झाले या घटनेने परिसर शोक मगन झालेला आहे. यावर्षी गणेशोत्सवाचा उत्सव संपूर्ण उत्साहात पार पडला. यानंतर आज लाडक्या गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात येत आहे. यातच आता जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या पित्यासह मुलावर अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत दोन्ही बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. ही थरारक घटना चाळीसगाव तालुक्यातील न्हावे गावात आज दुपारच्या सुमारास घडली. तर या घटनेत सुदैवाने महिला बचावल्या आहे.