ब्रेकिंग

मुसळधार पावसाने रस्ते झाले खड्डेमय वाहन धरकांना वाहन चालवताना करावी लागते कसरत.

नाशिक जनमत. नाशिक महानगरपालिका रस्त्याच्या कामावर कोट्यावधी रुपये खर्च करत असते परंतु दरवर्षी नव्याने बनवलेल्या रस्त्याचं सर्वच रस्ते पावसाळा आला की खड्डे मे होत असता अनेकदा हे खड्डे बुजवले जातात यांच्यावर धिग्ल लावली जातात. परंतु चार-पाच दिवसातच खड्डे पुन्हा पुन्हा होत आहे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे खुटवड नगर ते सातपूर आयटीआय रोडवर रस्त्याची चाळणी झाली आहे मोठे मोठे खड्डे रस्त्यावर पडलेले आहे महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर बुजवण्याची मागणी नागरिक करत आहे या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. महानगरपालिकेचे रस्ते बनवणे आणि खड्डे बुजवणे यामध्ये मोठा गोलमाल असल्याचे नागरिक बोलत आहेत नाशिक शहरातील सर्व रस्ते कायमस्वरूपी चांगली करावेत अशी मागणी वाहन धारक करत आहे. नाशिक सिटी ही स्मार्ट सिटी असून स्मार्ट सिटी चे मोठ्या प्रमाणात खड्डेमय सिटीमध्ये रूपांतर झाल्याचे चित्र सर्वत्र नाशिक मध्ये दिसत आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर तलाव साचले होते त्यामुळे महानगरपालिकेचे भुयारी गटार योजनेचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले♦ आहे. नाशिक शहरातील नागरिक सर्वत्र कर भरत असून नागरिकांना चांगली सुविधा का मिळत नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे. लवकरात लवकर खड्डे बुजून नागरिकांना रस्ते सुख सोयी उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी नागरिक करत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे