खाजगी बस व वाहनांनी निश्चित दरानुसार भाडे अकरावावे. प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे.
नाशिक जनमत संपादक चंद्रकांत धात्रक यांच्याकडून
*खाजगी बस व वाहनांनी निश्चित दरानुसार भाडे आकारावे*
*-प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे*
*नाशिक, दिनांक: 31 ऑगस्ट, 2022 (जिमाका वृत्तसेवा):* खाजगी प्रवासी बस व वाहनांनी निश्चित केलेल्या दरानुसार भाडे आकारणी करावी, असे आवाहन नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रदिप शिंदे यांनी केले आहे.
भाडे आकारणी बाबत 27 एप्रिल 2018 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विविध संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेण्यात आले आहेत. त्यानुसार खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या त्या संवर्गातील संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर भाडे दराच्या 50 टक्क्यापेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत.
शासन निर्णयानुसार निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने भाडे आकारणी केल्यास किंवा प्रवास करतांना येणाऱ्या अडचणींची तक्रार dycommr.emf2@gmail.com या ई-मेल आयडीवर प्रवाशांनी नोंदवावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. शिंदे यांनी कळविले आहे.