केंद्रीय गृहमंत्री राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या उपस्थितीत श्री त्रंबकेश्वर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या उपस्थितीत
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ संपन्न
*नाशिक : दिनांक २१ जून २०२२ (जिमाका वृत्त)* स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या प्रमुख उपस्थितीत आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर येथे आठवा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ संपन्न झाला. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. राय यांनी व योग विद्या गुरुकुलचे अध्यक्ष डॉ. विश्वास मंडलिक यांनी उपस्थितांना योग दिनानिमित्त संबोधित केले.
यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, अपर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी, प्रांताधिकारी तेजस चव्हाण हे उपस्थित होते.
सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या वतीने आणि नाशिक जिल्हा प्रशासन, योग विद्या गुरुकुल आणि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ट्रस्ट यांच्या सहकार्याने मंदिर परिसरात आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी योग विद्या गुरुकुल चे योगशिक्षक देविका भिडे, सारिका धारणकर आणि विष्णू ठाकरे योगासनांची प्रात्यक्षिक सादर केली. योग साधक पौर्णिमा मंडलिक यावेळी योगाचे महत्व विशद करणारे एक योगगीत सादर केले. योग विद्या गुरुकुल साधक यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी सामूहिक योगासनात आपला सहभाग नोंदविला.