आजादी का अमृत महोत्सवा अंतर्गत महावितरण तर्फे उज्वल भारत उज्वल भविष्य महाउत्सवाचे आयोजन.
*आजादी का अमृत महोत्सवातंर्गत*
*महावितरणतर्फे ‘उज्ज्वल भारत-उज्वल भविष्य’ महोत्सवाचे आयोजन*
नाशिक : दि. २४ जुलै २०२२
केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालय व राज्य ऊर्जा विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य” पॉवर २०४७ या ऊर्जा महोत्सवाचे राज्यभर आयोजन करण्यात येणार असून त्यानिमित्त जिल्हा प्रशासन व महावितरणतर्फे दिनांक २५ ते ३१ जुलै दरम्यान नाशिक जिल्ह्यात सुद्धा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील महावितरणच्या वतीने विद्युतीकरणाच्या विविध योजनांचा जागर महोत्सवात करण्यात येणार आहे.
या महोत्सवानिमित्त बुधवार दि. २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ऑफिसर्स क्लब, एकलहरे निर्मिती केंद्र परिसर, नाशिक तसेच शनिवार दि. ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे आणि रविवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता श्री. स्वामी समर्थ मठ, श्री. आनंदनाथ महाराज चॅरीटेबल ट्रस्ट, सावरगाव, ता. येवला, नाशिक या तीनही ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनाअंतर्गत जिल्ह्यात मागील ८ वर्षात ऊर्जा क्षेत्रात झालेल्या भरीव कामांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच ऊर्जाक्षेत्रातील आव्हाने आणि सन २०४७ पर्यंतचे ऊर्जेचे असलेले नियोजन हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमात केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचे लाभधारक आपले मनोगत व्यक्त करणार आहे. तसेच केंद्र शासनाने दिलेल्या आणि मराठी भाषेत अनुवादीत केलेल्या चित्रफीती दाखविण्यात येणार आहे. यासोबतच पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने व पोस्टर्सद्वारे वीजक्षेत्रातील प्रगती व माहितीचा जागर या कार्यक्रमादरम्यान करण्यात येणार आहे. दिनांक ३० जुलै रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे ऊर्जा विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यामध्ये वर्धा, कोल्हापूर, नंदूरबार गडचिरोली आणि नाशिक चा समावेश आहे. कार्यक्रमात ऊर्जा विभागाअंतर्गत वितरण क्षेत्रात वितरण प्रणालीचे बळकटीकरण (RDSS) या नविन योजनेची सुरूवात होणार आहे.
आजादी का अमृत महोत्सव या तीनही कार्यक्रमांसाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, ना.डॉ. भारतीताई पवार यांची प्रमुख उपस्थिती तर महाराष्ट्रविधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच खासदार डॉ.सुभाष भामरे व हेमंत गोडसे, जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय डॉ.सुधीर तांबे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, छगनरावजी भुजबळ, दादाजी भुसे, अँड.माणिकराव कोकाटे, दिलीप बोरसे, दिलीपराव बनकर, मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, डॉ.राहुल आहेर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सुहास कांदे, नितीन पवार, राहुल ढिकले, सरोज आहेर व हिरामण खोसकर, महावितरणचे संचालक(प्रकल्प) प्रसाद रेशमे, जिल्हाधिकारी गंगाधरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, ऊर्जा मंत्रालयाचे पी.एफ.सी चे राजीव फरलिया उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम आयोजनासाठी जिल्हा समन्वयक म्हणून महावितरणचे अधिक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, रमेश सानप व संजय खंडारे यांनी नियोजन केले आहे.
———————————