सिडकोत. शुभम पार्क परिसरामध्ये दहशत माजविणाऱ्या टोळक्याला अंबड पोलिसांनी केल गजाआड
नाशिक जनमत अंबड परिसरातील शुभम पार्क या परिसरामध्ये काल संध्याकाळी सात ते साडेसात च्या दरम्यान काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला गेला या वेळी अनेक वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या तसेच हातात काठ्या घेऊन या भागात दहशत पसरवण्यात आली त्यामुळे काही तास या भागातील नागरिक दहशतीखाली होते दरम्यान अंबड पोलिसांनी घटनास्थळावर येत काही वेळातच गुप्त माहितीच्या आधारे दहशत माजविणाऱ्या युवकांना गजाआड केले सध्या निवडणुका जवळ आल्या असून पुन्हा एकदा गुन्हेगारी डोके वर काढत आहे परिसरामध्ये पोलिसांनी गस्त वाढवणे महत्त्वाचे आहे. हातगाडी भत्त्याची. कार रिक्षा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सिडको परिसर नेहमीच निवडणुकीचा कालावधी मध्ये संवेदनशील असतो पोलिसांनी आतापासूनच गुन्हेगारांवर वचक बसवण्यात महत्त्वाचे आहे. रात्री की देखील गस्त वाढवणे महत्त्वाचे आहे सोनसाखळी घरफोडी इत्यादी प्रकार सिडको साठी कायमचे झाले आहे