लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’* *बॉइज टाऊन पब्लिक स्कूलमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा…*
*‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’*
*बॉइज टाऊन पब्लिक स्कूलमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा…*
नाशिकचे वैभव व जागतिक कीर्तिचे कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा जागतिक मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा होतो. हे औचित्य साधून दि.२७ फेब्रुवारी रोजी बॉइज टाऊन पब्लिक स्कूलमध्ये जागतिक मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शिरवडकरांनी लिहिलेल्या प्रार्थनेने झाली.
माणसांना एकमेकांशी जोडून ठेवणारे साधन म्हणजे भाषा ! भाषेचे महत्त्व सांगत मुलांनी विविधरंगी कार्यक्रम सादर केले. त्यामध्ये अनेक संत-साहित्यिकांची थोडक्यात ओळख, त्यांच्या प्रसिद्ध रचना, पोवाडा, कविता, अभंग इत्यादि सादर करून मुलांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. ‘पसायदान’ ह्या विश्वशांतीसाठी ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
ह्या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ यांनी मुलांचे कौतुक केले. पर्यवेक्षिका सौ. पद्मश्री संवत्सरे, भाषा शिक्षिका सौ. मुक्ता कुलकर्णी यांचे मुलांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.