ब्रेकिंग

लेखा विषयक बाबी सांभाळतांनाआहरन सवितरण अधिकाऱ्यांची कर्तव्य व जबाबदारी महत्त्वाची.

 

*लेखा विषयक बाबी सांभाळताना आहरण संवितरण अधिकाऱ्याची कर्तव्य व जबाबदारी महत्वाची*

*: डॉ. राजेंद्र गाडेकर*

 

*नाशिक विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने लेखा विषयक कार्यशाळेचे आयोजन*

 

*नाशिक,28 जून,2022 (विमाका वृत्तसेवा):*

प्रशासकीय कामकाजात सर्वात महत्वाची शाखा ही लेखा शाखा आहे. त्यामुळे आहरण संवितरण अधिकाऱ्यांची लेखा विषयक बाबी सांभाळताना कर्तव्य व जबाबदारी खूप महत्वाची आहे, असे प्रतिपादन वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी केले आहे.

 

नाशिक विभागातील माहिती कार्यालयांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विभागीय माहिती कार्यालय, नाशिक , वित्त व लेखा प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र वित्तीय व्यवस्थापन संस्था केंद्र, नाशिक , सह संचालक, लेखा व कोषागारे नाशिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लेखा विषयक कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील लेखा-भवन येथे करण्यात आले होते. त्यावेळी श्री. गाडेकर बोलत होते. या कार्यक्रमाला विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) ज्ञा.ना.इगवे, सहायक संचालक मोहिनी राणे, माहिती सहायक जयंत कर्पे, जयश्री कोल्हे, किरण डोळस, प्रदर्शन सहायक संजय बोराळकर लेखापाल शाम माळवे व विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

 

आहरण संवितरण अधिकाऱ्याची कर्तव्य व जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ. गाडेकर पुढे म्हणाले की, प्रशासकीय लेखा विषयक कामकाजाची जबाबदारी आहरण संवितरण अधिकाऱ्याची असून आहरण संवितरण अधिकारी हा शासकीय लेखा विभागाचा कणा असतो. लेखा विषयक बाबी हाताळतांना संबंधित अधिकाऱ्यांनी नियमांच्या आधिन राहून कामकाज करणे आवश्यक आहे. तसेच शासकीय निधीतून खर्च करतांना वित्तीय शिस्तीचा भंग करू नये, असेही डॉ. गाडेकर यांनी सांगितले.

 

कार्यालय प्रमुखांनी वेळोवळी रोख नोंदवही व कार्यालयातील इतर नोंदवह्यांची तपासणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध नियमावली, शासन निर्णय आणि नियमांचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लेखा विषयक बाबी हाताळताना १४ नोंद वह्यांची माहिती दिली. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसनही डॉ. गाडेकर यांनी केले.

 

  1. लेखाधिकारी मा.धो.थैल यांनी अर्थसंकल्प नियम, महाराष्ट्र कोषागार नियम-१९६८ तोंड ओळख या विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी अर्थसंकल्प म्हणजे आगामी वर्षातला अंदाजे जमा व खर्चाचा घेतलेला वेध. यावेळी त्यांनी सामान्य नागरिकांच्या दृष्टीकोनातून असलेला अर्थसंकल्प, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून, प्रशासकीय नजरेतून असलेला अर्थंसंकल्प याविषयी माहिती दिली.

 

प्रशिक्षण कार्यशाळेत सेवानिवृत्त लेखाधिकारी शरद मोराणकर यांनी खरेदी प्रक्रीया, GEM पोर्टल या विषयावर मार्गदर्शन केले. टीसीएस प्रतिनिधी मुकेश नाईकनवरे यांनी सेवार्थ व कनिष्ठ लेखापाल हर्षदा भडके यांनी बील पोर्टल विषयावर मार्गदर्शन केले.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे