मुलीशी बोलण्यावरून वाद. एका तरुणाचा दुसरा तरुणावर कोणत्या ने वार
मुलीशी बोलतो म्हणून सामनगावरोडवर एका तरुणाचा दुसऱ्यावर कोयत्याने वार
नाशिक जन्मत शाळा महाविद्यालय परिसरामध्ये टवाळखोरांचा मोठा उद्रेक झाला असून महाविद्यालय परिसरामध्ये हाणामारामारी निर्मिती झाली आहे. त्यातच शालेय विद्यार्थिनी देखील आता सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शाळा परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त ग्रामीण भागात देखील असावा अशी मागणी आता ग्रामीण भागातून होऊ लागली आहे. काल सामनगाव येथे कॉलेजमध्ये अशीच घटना घडली आहे याबाबत माहिती अशी की. ‘तू माझ्या ओळखीच्या मुलीशी का बोलतो’ असे म्हणत सामनगावरोडवरील पॉलिटेक्निकल महाविद्यालयाबाहेर एका तरुणाने दुसऱ्यावर कोयत्याने वार केले. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश चौधरी (रा. सिडको) शनिवारी रात्री पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या समोर उभा होता. याचवेळी कृष्णा चव्हाण (रा. सामनगाव रोड) हा त्याच्याजवळ गेला आणि तु त्या मुलीशी का बोलतो म्हणून कोयत्याने कल्पेशच्या कमरेला आणि मांडीवर वार करुन गंभीर दुखापत केली आहे. याबाबत नाशिकरोड पोलिस अनिल पवार हे तपास करीत असुन संशयित आरोपी फरार आहे. दरम्यान या घटनेमुळे इतर विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये देखील खळबळ उडालेले आहे. ज्या ठिकाणी ज्ञान शिक्षण भेटते त्या ठिकाणी आता सरसपणे विद्यार्थी दप्तरात चाकू फाइटर व परिसरात कोयते घेऊन फिरत असल्याचे समोर आले आहे.