ब्रेकिंग

नागपूरच्या अकरा वर्षाच्या आदिती ची कमाल. आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद.

 

 

नाशिक जनमत  नागपुरच्या ११ वर्षाच्या आदितीची कमाल, द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

 

नागपूर (दि.19 ): कोणताही व्यक्ती साधारणपणे आपल्या पंचेज्ञानेद्रीयांचा वापर करून एखाद्या गोष्टीचा अनुमान लावत असते. परंतु नागपूरच्या अवघ्या ११ वर्षीय आदितीच्या संवदेन शक्तीचा वापर करून डोळ्यावर पट्टी बांधून एखादी गोष्ट ओळखण्याचे प्रात्यक्षिक पाहून सर्वजण अचंबित होत आहेत. आदिती हि कोणतीही वस्तू, रंग, पैसे हे तिच्या संवेदन शक्तीचा वापर करून ओळखते. इतकेच नाही तर पुस्तक हि वाचते, आहे कि नाही कमाल! तिच्या याच कार्याची नोंद आता ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये संवदेन शक्तीचा वापर करून वस्तू ओळखणारी सर्वात लहान वयाची मुलगी म्हणून झाली आहे.

आदिती साधारण 9 वर्षाची असताना तिने हे सगळं शिकण्याकरिता क्लासेस केले होते. त्यानंतर नंतर प्रचंड मेहनत घेऊन तीने यात यश मिळवले. इतकेच नाही तर अनेकांना तिचे याचे धडे देखील दिले. आदितीला या कामी तिची आई प्रियंका मेश्राम यांची विशेष मदत लाभली.

 

काय आहे सुपर सेन्सरी पॉवर ?

आपल्या मेंदूमध्ये असलेली संज्ञानात्मक क्षमता म्हणजे आपला मेंदू लक्षात ठेवण्याचे मार्ग. तुमची संज्ञानात्मक क्षमता तुम्हाला ती माहिती घेऊन आणि ती तुमच्या मेंदूतील योग्य भागात वितरित करून नवीन माहितीवर प्रक्रिया करण्यात मदत करते. संज्ञानात्मक कौशल्ये, किंवा संज्ञानात्मक क्षमता, तुमचा मेंदू लक्षात ठेवण्याचे मार्ग, कारणे, लक्ष वेधून घेणे, समस्या सोडवणे, विचार करणे, वाचणे आणि शिकते. तुमची संज्ञानात्मक क्षमता तुम्हाला ती माहिती घेऊन आणि तुमच्या मेंदूतील योग्य भागात वितरित करून नवीन माहितीवर प्रक्रिया करण्यात मदत करते. जेव्हा तुम्हाला नंतर त्या माहितीची आवश्यकता असते, तेव्हा तुमचा मेंदू ती माहिती पुनर्प्राप्त करण्यासाठी आणि वापरण्यासाठी संज्ञानात्मक कौशल्ये देखील वापरतो. संज्ञानात्मक कौशल्ये विकसित करून, तुम्ही तुमच्या मेंदूला ही प्रक्रिया अधिक जलद आणि कार्यक्षमतेने पूर्ण करण्यास मदत करता आणि तुम्ही ती नवीन माहिती समजून आणि प्रभावीपणे प्रक्रिया करत असल्याचे सुनिश्चित करता. आदिती हीच क्षमता वापरून डोळ्यावर पट्टी बांधून अनेक वस्तू, रंग, शब्द ओळखते आणि सर्व प्रकारची पुस्तके देखील वाचते. सर्व प्रकारची पैसे देखील ओळखते. आदिती या सर्व गोष्टी तिच्या ह्या संवेदन शक्तीद्वारे करते.

 

आदितीच्या या कला कौशल्याची नोंद आता ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये’ झाली आहे. आदितीला तिचे Brain INN8 च्या प्रशिक्षक शितल समर्थ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच द आयडियल इंडियन रेकॉर्ड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद होण्याकरिता संभाजीनगर, महाराष्ट्र येथील प्रसिद्ध मेमोरीगुरु व लिमका बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर सचिन कुमार यांचे सहकार्य लाभले. आदितीचे या यशाबद्दल समाजातील सर्व माध्यमातून कौतुक होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे