ब्रेकिंग
चांदवड घाटात दोन कंटेनरचा भीषण अपघात. वाहनांच्या लागल्या लांब लांब रांगा
नाशिक जनमत वीरेंद्र चव्हाण यांच्याकडून चांदवड घाटात आज संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास दोन कंटेनर मध्ये समोरा समोर भीषण अपघात झाला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात कंटेनर चे नुकसान झाले असून रस्त्यावर ट्राफिक जाम झाले आहे सदर कंटेनर हे क्रेनच्या साह्याने बाजूला करण्याचे काम चालू आहे तसेच घटनास्थळावर कंटेनर चालक व किन्नर गंभीर जखमी झाले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांतर्फे प्रयत्न चालू आहेत. व वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे दरम्यान एका कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे घटनास्थळावर पोलिस दाखल झाले आहेत