ब्रेकिंग

सापडलेल्या बालकांच्या पालकांना* *ओळख पटविण्याचे आवाहन*

 

*सापडलेल्या बालकांच्या पालकांना*

*ओळख पटविण्याचे आवाहन*

 

*नाशिक, दिनांक 19 जून, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा):* महिला व बाल कल्याण समिती नाशिक मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालया अंतर्गत बालगृहामध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके दाखल केली जातात. सदर बालकांची ओळख पटवून संपर्क साधाण्याचे आवाहन सदस्य सचिव जिल्हा बाल संरक्षण कक्ष तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनिल दुसाणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

*असा आहे बालकांचा तपशिल*

*1.* कुमार श्रीराम, वय 13 दिवस हा बालक 13 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7.15 वाजेस येवला तालुका पोलीस स्टेशन,तालुका येवला यांच्या हद्दीत शेत गट नं 124 या शेतात रोडच्या कडेपासून 20 फूट अंतरावर कपड्यात गुंडाळलेल्या स्थितीत महालखेडा चांदवड शिवार, तालुका येवला, जिल्हा नाशिक येथे विनापालक आढळून आल्याने त्यास जिल्हा शासकीय रूग्णालय, नाशिक येथे दाखल केले होते. तिला रूग्णालयातून डिस्चार्ज केल्यानंतर 19 एप्रिल 2024 रोजी बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये बालकास श्रीराम नाव देवून आधाराश्रम, घारपुरे घाट, नाशिक संस्थेत दाखल केले आहे.

*2.* कुमार सार्थक मारूती खेंगले, वय 8 वर्षे हा बालक 30 नोव्हेंबर 2022 रोजी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन मार्फत बाल कल्याण समिती नाशिक यांच्या आदेशान्वये मुलांचे बालगृह, उंटवाडी रोड नाशिक येथे दाखल करण्यात आला. तेथुन 6 डिसेंबर 2022 रोजी ह.भ.प. पोपट महाराज बालसदन मांगीतुंगी येथे त्यास दाखल करण्यात आले. त्यानंतर 16 जानेवारी 2024 रोजी मुलांचे निरीक्षणगृह /बालगृह मालेगाव, जिल्हा नाशिक येथे या बालकाचे पुनवर्सन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदर बालक 17 जानेवारी 2024 रोजी निरीक्षणगृह /बालगृह मालेगाव येथे दाखल झाले असून अद्यापही त्याच्या पालकांचा तपास लागलेला नाही.

 

*3.* कुमार अमोल देवराज पाटील वय 8 वर्षे हा बालक 13 नोव्हेंबर 2022 रोजी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन मार्फत बाल कल्याण समिती नाशिक यांच्या आदेशान्वये मुलांचे बालगृह, उंटवाडी रोड नाशिक येथे दाखल करण्यात आला. तेथून 6 डिसेंबर 2022 रोजी ह.भ.प. पोपट महाराज बालसदन मांगीतुंगी येथे त्यास दाखल करण्यात आले. त्यानंतर 17 एप्रिल 2024 रोजी मुलांचे निरीक्षणगृह /बालगृह मालेगाव, जिल्हा नाशिक येथे या बालकाचे पुनवर्सन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 17 एप्रिल 2024 रोजी कुमार अमोल हा निरीक्षणगृह /बालगृह मालेगाव येथे दाखल झाले असून अद्यापही त्याच्या पालकांचा तपास लागलेला नाही.

 

या तीनही बालकांच्या भविष्याचा विचार करता कुमार श्रीराम याच्या पालकांनी आधाराश्रम संस्था, घारपुरे घाट, नाशिक येथे 0253-2580309, 2950309 या दूरध्वनी क्रमांकावर , कुमार सार्थक व कुमार अमोल यांच्या पालकांनी मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, मालेगाव कॅम्प, तालुका मालेगाव नाशिक येथे 02554-254759 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष नाशिक, समाज कल्याण आवार, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक 0253- 2236368 या ठिकाणी संपर्क साधावा.

 

माहिती प्रसारणाच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत बालकांचा दावा करण्यास कोणी आले नाही तर बालकांना पालक नसल्याचे गृहीत धरून पुढील पुनर्वसनाचा विचार करण्यात येणार असल्याचेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनिल दुसाणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे