ब्रेकिंग

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ’ प्रतिबंध अधिनियमावर**नाशिक येथे आज कार्यशाळा. *मान्यवरांचे लाभणार मार्गदर्शन*

*‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ’ प्रतिबंध अधिनियमावर**नाशिक येथे आज कार्यशाळा.

*मान्यवरांचे लाभणार मार्गदर्शन*

*नाशिक, दि. १७ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा)* : महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्यातर्फे मंगळवार १८ ऑगस्ट, २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियमांतर्गत विशेष जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळा होणार आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाणे यांनी ही माहिती दिली आहे.

 

या कार्यशाळेत महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल एन. रोकडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी आदी उपस्थित राहतील.

 

महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, सन्मान देणाऱ्या कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम म्हणजेच ‘पॉश’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्नशील आहे. त्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयात तसेच महाविद्यालयांमध्ये आयोगातर्फे सातत्याने क्षमता बांधणी कार्यक्रम होत आहेत.

 

या माध्यमातून कायद्यातील कलमे, तरतुदी, तक्रार निवारण्याची प्रक्रिया, संबंधित यंत्रणांची भूमिका आणि प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. याबरोबरच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित सहभागींच्या कायद्याविषयीचा समज व क्षमता वृद्धीवर भर देण्यात येईल.

 

या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ॲड. सीमा शर्मा या कायद्याची, तर दुसऱ्या सत्रात प्रतिमा ठाकूर या तक्रार निवारण कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करतील. सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे