ब्रेकिंग

इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात तीन मुली व दोन मुलांचा बुडून मृत्यू नासिक मधील गोसावी वाडीवर शोककळा.

इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात ५ जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन यात ३ मुली व २ मुलांचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार दि. २१ नाशिकरोड येथील गोसावी वाडीतील एकाच कुटुंबातील काही जण MH 15 JA 2961 भावली धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. सायंकाळच्या सुमारास यातील काही तरुण आंघोळीसाठी भावली धरणाच्या पाण्यात उतरले असता बुडत असल्याचे पाहुन त्यांना वाचवण्यासाठी इतर तीन जणांनी पाण्यात उड्या मारून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वाचवण्याच्या नादात हे सर्वच पाच जण बुडाले. त्यांना वाचवण्यासाठी स्थानिक आदिवासी तरुणांनी ऊड्या मारून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यात सर्वांचा मृत्यु झाल्याने या सर्वांना पाण्या बाहेर काढण्यात आले.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी धाव घेवुन मदतकार्य करत हे सर्व मृतदेह जगतगुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या मोफत रुग्ण वाहीका, ठाकुर रुग्णवाहिका व १०८ रुग्णवाहिकेतून इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे. या दुर्घटनेत १) अनस खान दिलदार खान, वय १७ वर्ष, २) नाझिया इमरान खान, वय – १५ वर्ष, ३) मीजबाह दिलदार खान, वय – १६ वर्ष, ४) हनीफ अहमद शेख, वय – २४ वर्ष, ५) ईकरा दिलदार खान, वय १४ वर्ष या सर्वांचा बुडुन मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गोसावीवाडीत शोककळा पसरली असुन नातेवाईकांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली होती.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे