ब्रेकिंग

पंढरपूर-पंजाब सायकलवारीचा पंजाबच्या राजभवनात राज्यपालांच्या उपस्थितीत चंदिगड येथे महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा रंगला सोहळा समारोप…*

  1. *पंढरपूर-पंजाब सायकलवारीचा पंजाबच्या राजभवनात राज्यपालांच्या उपस्थितीत चंदिगड येथे महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा रंगला सोहळा समारोप…*चंदीगड…

    पंढरपूर-पंजाब सायकलवारीचा प्रारंभ कार्तिकी एकादशीला पंढरपूर मधून माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या हस्ते झाला होता. या सायकल वारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 110 बंधू भगिनींनी आले होते. 10 भगिनींचा समावेश होता. या सायकल वारीत साधारण 45 ते 75 वयापर्यंतचे बंधू-भगिनी होते. यामध्ये नाशिकचे तीन सायकल वीर…
    महेश बडगुजर
    रत्नाकर शेजवळ रेल्वे डाक सेवा
    अरविंद निकुंभ हे तिघे होते.त्यांना नाशिक मधील श्री .सजींव तुपसाखरे ,डाॕ.आबा पाटील व रविंद्र साळी यांनी सहकार्य केले.
    संत नामदेव महाराज साडेसातशे वर्षांपूर्वी ज्या मार्गाने पायी गेले होते त्याच मार्गाने ही सायकल रॅली 24 दिवसानंतर साधारण 2400 किलोमीटर अंतर पार करून सायकल रॅली घुमानला पोहोचली. फुलांच्या वर्षाव, बँड पथकाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, फुलांच्या पाकळ्यांचा पायघड्या घालून, मिठाई वाटून घुमानवासियांनी या सायकल स्वारांचे जल्लोष स्वागत केले, सायकल स्वारांना प्रशस्तीपत्र आणि नामदेव महाराजांचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
    यानंतर चंदीगड येथील राज्यपाल भावनात राज्यपालांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.
    पंढरपूर-पंजाब सायकलवारीच्या माध्यमातून दोन्ही राज्यांच्या आध्यात्मिक विचारांचा संगम साधला गेला आहे. असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहीत यांनी 28 तारखेस राज्यपाल भावनात केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही राज्यांच्या अध्यात्मिक विचारांचा सुरेख संगम अन् भक्तीपरंपरेचा अनुपम्य सोहळा अनुभवास मिळाला.
    भागवत धर्म प्रचारक समिती, संत नामदेव समाजोन्नती परिषद, महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंढरपूर-पंजाब सायकलवारीचा समारोप सोमवारी 28 रोजी पंजाबचे राज्यपाल यांच्या उपस्थितीत झाला.
    यावेळी प्रधान सचिव राखी गुप्ता भंडारी, संत नामदेव महाराजांचे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास, निरंजननाथ गुरु शांतिनाथ, सूर्यकांत भिसे, तरसेमसिंग बावा, मनोज मांढरे, सुनील गुरव आणि नामदेव भक्तगण आदी उपस्थित होते.
    राज्यपाल पुरोहित म्हणाले की पुरातन काळा प्रमाणे आजही संतांच्या पादुकांची पूजा होते. अनेक संस्कृती काळाच्या पडद्याआड गेल्या मात्र भारतीय संस्कृती आजही टिकून आहे. याचे मूळ कारण म्हणजे भारतातील संत परंपरा आहे. संतांनी कायम समाजात शांती, समता, बंधुता टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले. संतांनी तीर्थ यात्रा करून समाजाचा उद्धाराचा प्रयत्न केला. या सायकलरॅलीच्या माध्यमातून पंजाब आणि महाराष्ट्राच्या अध्यात्मिक सुरेख संगम झाला आहे. संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माचा अनेक राज्यात प्रसार केला. त्यामुळे ते केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर सर्व देशाचे संत आहे. पंजाब मध्ये ही शिख बंधू नामदेव महाराजांना महाराष्ट्र इतकेच मानतात. त्यामुळे यामध्ये भेदभाव करू नये. पंढरपूर-पंजाब सायकलवारीने आज इतिहास घडवला आहे.
    निरंजननाथ गुरु शांतिनाथ यांनी प्रास्ताविकात म्हणाले की, संत नामदेव रायांनी वारकरी संप्रदायाच्या आधारे संप्रदायाचा पाया रूजविला. आणि प्रेमाच्या विचाराचे अधिष्ठान निर्माण होऊन भक्तिमार्गाचा ज्ञानदीप पंजाब मध्ये रुजविला.
    यावेळी संत नामदेव दरबार कमिटी व सायकल वारीच्या समितीच्या वतीने राज्यपाल पुरोहित यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मोही यांनी केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे