मालेगाव परिसरामध्ये विनयभंगाच्या घटना वाढीला. विद्यार्थिनी वर अत्याचाराचा प्रयत्न.
मालेगाव परिसरामध्ये विनयभंगाच्या घटना वाढीला. विद्यार्थिनी वर अत्याचाराचा प्रयत्न.
मालेगाव प्रतिनिधी मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे सरकारने सरकारने कडक कायदा काढून अशा घटना थांबवणे महत्त्वाचे झाले आहे. जोपर्यंत गुन्हेगारांवर फाशी देण्यासारखी क** कारवाई होत नाही तोपर्यंत अशा घटना होत राहतील असे जण सामान्य बोलत आहे. मालेगाव मध्ये पुन्हा अत्याचाराची घटना घडली असून डोंगराळे येथील घटनेनंतर पंधरा दिवसात चार घटना झाले आहेत.
शहर व तालुक्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डोंगराळे येथील अत्याचार व खुनाच्या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली असताना, दोन आठवड्यांत ‘पोक्सो’ अंतर्गत पाच गुन्हे दाखल झाले आहेत. मंगळवारी (दि. २) दुपारी शाळेत जाणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीस संशयिताने बळजबरीने दुचाकीवर बसवून नेत गिरणा डॅम परिसरात अत्याचार करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. घटना समोर येताच मालेगाव तालुका पोलिसांनी संशयित रिजवान हरिष नियाज अहमद ऊर्फ रिजवान ‘टायगर’ अन्सारी याला अटक केली आ
पीडित मुलगी पायी शाळेत जात होती. तेव्हा रिजवान हा दुचाकीवरून आला. बळजबरीने दुचाकीवर बसवून मुलीस गिरणा डॅम परिसरातील उंबरदे शिवारात नेले. तेथे अत्याचाराचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्याने त्याने धमकी देत तिला पुन्हा शहरात आणून सोडले. मुलीने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितल्याने मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. संशयताला अटक करून कोर्टात सादर केले आहे. मालेगाव परिसरामध्ये नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.