मनमाड जवळील हडबीची शेंडी उतरताना पडून नगरच्या दोन अनुभवी ट्रेकर्स चा मृत्यू.
नाशिक जनमत: अमोल भाबड यांच्याकडून मनमाड शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण हडबीची शेंडी या डोंगरावरून उतरताना 110 फूट उंचावरून खाली पडून पट्टीच्या दोन ट्रेकर्स चा मृत्यू झाला एक जण जखमी आहे इतर बारा ट्रेकर्स सुखरूप आहेत रात्री उशिरा तिने जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तपासणी केली असता दोन जणांचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन करण्यात करीता नातेवाईक आल्यानंतर ओळख झाल्यावर पाठवण्यात येणारआहे असल्याची माहिती पोलिसांनी दिली .आगठ्या सारखा दिसणारा हा डोंगर एकदम सरळ आहे यावरून उतरताना ही घटना घडली आहे अंधारामुळे मदत कार्याला विलंब व उशीर येत होता काल सायंकाळी उशिरा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले . ट्रेकर्स अहमदनगर येथील आहेत आठ मुली व सात मुले असे एकूण पंधरा जण ट्रेकिंगसाठी याठिकाणी आले होते अंगठ्या सारख्या दिसणाऱ्या सुळक्यार त्यांनी यशस्वी चढाई केलेली होती. खिळे ठोकून त्यांनी रोपे बांधलेला होता दोन पट्टी चे ट्रेकर्स मयूर मस्के व अनिल शिवाजी वाघ हे सर्वात शेवटी खाली येत होते रोपे वरून खाली येताना रोपेवरील खिळे काढताना तीन जण वरून खाली पडले. बाजूच्याच्या गावच्या ग्रामस्थांनी देखील या वेळेस मोठ्या प्रमाणात मदत केली संध्याकाळी पाच वाजता ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे कातरवाडी व मनमाड येथील तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन करत सर्वांना खाली पायथ्याशी आणले अंधार पडल्यानंतर मृत्यू देह शोधण्यात यश आले. एका जखमी वर उपचार चालू आहेत. या घटनेने मनमाड परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे प्रशांत पवार हा जखमी आहे