
नाशिक जनमत *स्वावलंबी भारताचा पुढील पंचवीस वर्षाचा आराखडा स्पष्ट करणारे बजेट-प्रदीप पेशकार*
माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अतिशय अर्थपूर्ण व स्वावलंबी भारताचा पुढील पंचवीस वर्षाचा आराखडा स्पष्ट करणारा अर्थसंकल्प आज सादर केला.
सर्व घटकांना न्याय देताना प्रामुख्याने युवकांचा रोजगार स्वयंरोजगार क्षम भारतीय जनसंख्या चा विचार करून सर्व योजना असलेल्या दिसत आहेत मेक इन इंडिया च्या अंतर्गत साठ लाख नोकऱ्या तर आत्मनिर्भर भारत च्या अंतर्गत सोळा लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट यात दिसते. नोकरी बरोबरच उद्योग लघुउद्योग स्वयम रोजगार स्टार्ट अप कृषी उद्योग या सर्वांनाच लाभ मिळेल अशी योजना दिसते. एम एस एम ई सुधार साठी सहा हजार करोड तर ई सी एल जी एस द्वारे एक लाख तीस हजार पेक्षा जास्त उद्योगांना कर्ज तर मार्च ते वीस पर्यंत योजनेची व्याप्ती वाढवणे तसेच गॅरंटी कव्हर 50 हजार कोटी वरून पाच लाख कोटी करणे आणि दोन लाख कोटी नवीन नीधी.यातून लघु उद्योग वाढीस मदत होणार.
संरक्षण क्षेत्रात 68% घरेलू उत्पादन तर 25% start up व लघु उद्योगातील R and D साठी बजेट दिले.
कार्पोरेट टॅक्स 18%वरुन 15 टक्के तर संरचार्ज 12% वरुन 7% पर्यंत कमी केला.
पंधरा सेक्टरला PLI स्कीम लागू . सहकारी संस्थांच्या मॅट मधे 18.5% ते 15% पर्यंत कमी केल्याने महाराष्ट्र तील संस्थांना फायदा.
एकुणच युवासाठी रोजगाराभिमुख , कृषी साठी आश्वासक, संरक्षण क्षेत्रासाठी आत्मनिर्भर बनवणारे , डिजिटल करन्सी मुळे भारत समृद्ध होईल.तर 75 जिल्ह्यात डिजिटल बॅंक सूरु होतील . समृद्ध भारताचा स्वप्नपूर्ती करणारा अर्थसंकल्प म्हणता येईल.
प्रदीप पेशकार
प्रदेशाध्यक्ष
भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र
व
सदस्य
नॅशनल बोर्ड फाॅर एम एस एम ई.
भारत सरकार.