ब्रेकिंग

दिव्यांग बांधवाना केलेली मदत पुण्यदायी डॉ. गुट्टे महाराज ; दिव्यांग बांधवांना फराळ वाटप, मान्यवरांचा सन्मान .

दिव्यांग बांधवाना केलेली मदत पुण्यदायी

 

डॉ. गुट्टे महाराज ; दिव्यांग बांधवांना फराळ वाटप, मान्यवरांचा सन्मान

 

 

नाशिकः प्रतिनिधी

जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपले या उक्ती नुसार बाळासाहेब घुगे यांचे कार्य सुरू आहे.

घुगे जरी दिव्यांग असले तरी त्यांचे कार्य महान आहे. तसेच श्रीराम लीला दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने जी दिव्यांग सेवा केली जाते ती खरंच कौतुकास्पद आहे. दिवाळीच्या फराळ वाटप, असो ब्लॅंकेट वाटप किंवा दिव्यांगांचे साहित्य वाटप असे उपक्रम खूप प्रेरणा देणारे असल्याचे विचार संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले

 

भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी , रामलीला एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीराम लीला दिव्यांग पुनर्वसन केंद्र सातपूर ,क्रांतिवीर व. ना. नाईक क्रांती सेना व न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांना फराळ वाटप व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

यावेळी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज अध्यक्षस्थानी होते.तर जेष्ठ उघोगपती बुधाजी पानसरे, जेष्ठ नेते गिरीश पालवे,दिव्यांग आघाडीचे महाराष्ट्र संघटक काकासाहेब दिक्षीत यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी आ. हिरे म्हटले कि ,यमुनाताई व बाळासाहेब घुगे जरी दिव्यांग असले तरी त्यांचे कार्य चांगल्या माणसाला लाजवेल असे आहे. कोणताही कार्यक्रम असो बाळासाहेब हिरारीने घेतात. पालवे यांनीही बाळासाहेब घुगे यांनी आम्हाला पुरस्कार दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. बुधाजी दादा पानसरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. कारण स्वतः बाळासाहेब आधी दिव्यांगांची दिवाळी नंतर माझी ह्या संकल्पनेमुळे दिवाळी साजरी करतात. यावेळी भाजपा सिडको मंडल अध्यक्ष रवी पाटील ,शिवाजी नाना बरके, दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोटीराम सूर्यवंशी साहेब ,शहराध्यक्ष विनायक कस्तुरे, डी बी राजपूत ,दिलीप देवांग ,पिंटू भाऊ काळे ,दशरथ गांगुर्डे, सह दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घुगे ,अरुणा दरगुडे, रंगनाथ दरगुडे

यांनी केले. श्री बीके नागरे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

 

 

यांचा झाला सन्मान …

नाशिक पश्चिम च्या आमदार सिमा हिरे यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला तसेच आदर्श माता हिराबाई बुधाजी पानसरे, जेष्ठ पत्रकार मुंबई येथील दताराम घुगे , प्रविण बोडके, रुसूया पठाण, राजेंद्र जडे, दत्तात्रय धात्रक ,नगरसेविका छाया देवांग, पत्रकार प्रमोद दंडगव्हाळ , धनंजय बोडके,नरेंद्र दंडगव्हाळ, अजय भोसले, जितेंद्र गिरासे, चंदन भाऊ खतेले ,यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे