डीजेपी नगर दोन भागात मुख्य रस्त्यावर भरणाऱ्या भाजीपाला बाजार मुळे अपघाताच्या घटना वाढल्या.
नाशिक जनमत गेल्या दोन वर्षांमध्ये अंबड परिसरातील डीजेपी नगर दोन भागातील मुख्य रस्त्यावर संध्याकाळी पाच ते रात्री दहापर्यंत भरणारा भाजीपाला बाजार हा अनधिकृत असून भाजीपाला बाजारामुळे या रस्त्यावर गेल्या दोन वर्षात 50 वरून अधिक अपघात झालेले आहे आनेक नागरिकांना जीव देखील गमावा लागलेला आहे. हा रस्ता अंबड औद्योगिक वसतीकडे जाणारा मुख्य रस्ता आहे तसेच सातपूरकडे देखिला रस्ता जातो. यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात संध्याकाळी येणाऱ्या जाण्या वाहनाची ची गर्दी असते. त्यातच भाजीपाला विकणारे व्यवसायिक रस्त्यावरच रस्त्यावर पुढे येऊन आपल्या हातगाड्या लावतात तसेच पुढे सरकून भाजीपाला लावत असल्याने अंबड कडून माऊली लांस कडे जाणाऱ्या रस्ता पूर्णपणे भाजीपाला विक्रेते व नागरिकांनी व्यापला जातो त्यामुळे मोटरसायकल वाहने. भाजीपाला येणाऱ्या व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना ठोस देत अनेक अपघात झालेले आहे. या बाजाराकडे नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभाग जाणून दुर्लक्ष करत आहे. भाजीपाला व्यापारी व अतिक्रमण कर्मचारी यांच्या आर्थिक देणे घेणे असल्याचे नागरिक बोलत असल्याने या बाजाराची व्याप्ती वाढत चालली आहे याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्ष केले आहे. दरम्यान हा बाजार या मुख्य रस्त्यावरून हटवून दुसरीकडे स्थलांतरित करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभाग याकडे लक्ष देणार का. अपघाताला निमंत्रण देणारा असा हा रस्ता भाजीपाला बाजारामुळे होत आहे. मोठी घटना घडल्यानंतरच महानगरपालिकेला जाग येणार का असा प्रश्न वाहन धारका तर्फे विचारला जात आहे . या बाजारसमोरच पोलीस चौकी असून देखील पोलीस या ठिकाणी उपस्थित राहत नाही. रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर साठी असलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनाधिकृतपणे वाहने लागत असून त्यावर देखील भाजीपाला विकला जात आहे दरम्यान हजारो नागरिक या रस्त्याने येतात व जातात तसेच हजोरो वाहने या रस्त्यावर येजा करतात. त्यामुळे नागरिकांना व महिलांना त्या रस्त्यावरून जाताना संध्याकाळी जीव मुठीत धरून चालावे लागते. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून लवकरात लवकर हा अनाधिकृत बाजार या जागेवरून उठावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.