नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे अन्न औषध प्रशासनाची कारवाई 46 लाख रुपयाचे मुद्देमाल व वाहन जप्त
बोलठाण येथे अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही ४६ लाखांचा मुद्देमाल आणि वाहन जप्त
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
नाशिक जिल्ह्यातील आणि नांदगाव तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या बोलठाण येथे सोमवार दिनांक 7 मार्च रोजी अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाई मध्ये ४६ लाख २६०५५ रुपयांचे गुटखे आणि एक गुन्हा करण्यासाठी वापर केलेले वाहन जप्त केले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार समजते की औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील व्यापारी गोकुळ बाबूलाल कोठारी वय ४६ वर्ष यांच्या मे. प्रिन्स ट्रेडिंग या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे नाशिक येथील अधिकारी अमित उत्तम रासकर वय ३८, अ.र. दाभाडे, गोपाल कासार, दर्शन मोरे यांनी सोमवारी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी अचानक भेट देऊन पाहणी केली असता, याची वाच्यता झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होत असल्याने पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, पो.नाईक अनिल गांगुर्डे, पो.शिपाई प्रदिप बागुल, अभिजीत ऊगलमुगले, शांताराम महाले, किरण राउत यांनी बंदोबस्त ठेवल्याने अनुचित प्रकार घडला नाही.
अन्न व औषध प्रशासन विभाग नाशिकच्या वरील अधिकाऱ्यांनी तेथील कसून दोन खोल्यांमध्ये कसून तपासणी केली असत तेथे केशर युक्त विमल १२४८१ पुडे, हिरा पानमसाला १०७३ पुडे, गोवा गुटखा २६२५, रॉयल सुगंधी तंबाखू १०७३ पुडे, राजश्री पान मसाला ५१५पुडे, आर एम डी. पान मसाला ३८२ पुडे, मिराज सुगंधी तंबाखू १२६ पुडे आणि इतर सुगंधी तंबाखू १२४८१ या सर्व पान मसाले आणि सुगंधी तंबाखू राज्यात विक्री करण्यास बंदी असतांना गोकुळ कोठारी यांच्या प्रिन्स ट्रेडिंग कंपनी येथील दोन खोल्यांमध्ये आढळून आल्याने जप्त केले असून या गुन्ह्यातील आरोपी यांचे सासरे (जैन पुर्ण नाव माहीत नाही राहणार औरंगाबाद) यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकावने, गोंधळ घालने, सरकारी कामात अडथळा निर्माण करत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग नाशिकचे अमित उत्तम रासकर (वय ३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये
३५३, ३२८, १७९, १८८, २७२,२७३ यासह अन्न सुरक्षा कायदा कलम २६(२) (१), ३(१) ( zz)( v ) ५९ २६ (२) (४) व २७ (३) (ड) २७ (३) (इ) नुसार नांदगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर मध्ये ६०/२०२२ नोंद केली आहे. याबाबत माहिती पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम गाढे यांनी दिली, दरम्यान वरील गुन्ह्यातील दोन्ही आरोपी बाथरूमला जावून येतो असे सांगुन, अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरु होती. अधिक तपास पोलीस निरीक्षक गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज वाघमारे हे करत आहेत.