ब्रेकिंग

आ.सीमाताई हिरे आमची लाडकी बहीण त्याना कधीही निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे.*

*आ.सीमाताई हिरे आमची लाडकी बहीण त्याना कधीही निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे.*

नाशिक जनमत. प्रतिनिधी.  आय.टी.आय पूल ते वावरे नगर रस्त्याच्या काँक्रेटीकरण कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी निधीची मंजुरी आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मिळाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सीमाताई हिरे यांचे कौतुक करत, त्यांना “माझी लाडकी बहीण” म्हणून संबोधले आणि असे आश्वासन दिले की त्यांच्या प्रयत्नांसाठी कधीही निधी कमी पडणार नाही.

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री दादाजी भुसे यांची उपस्थिती देखील होती. या प्रकल्पामुळे वावरे नगर आणि त्याच्यासोबतच्या परिसरातील रहिवाशांना वाहतूक सोयीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. रस्त्याचे काँक्रेटीकरण झाल्याने वाहनचालकांना सुरक्षितता आणि सोय मिळेल, तसेच अपघातांचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे.

सुमारे २० कोटी रुपयांच्या खर्चातून होणाऱ्या या कामामुळे संपूर्ण परिसराचा विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे व्यवसाय क्षेत्रांनाही चालना मिळणार असून, नागरिकांची दैनंदिन कामकाजातील हालअपेष्टा कमी होतील.

प्रत्येक पावसाळ्यामध्ये हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब होत असतो दरम्यान आता काँक्रिटीकरण रस्ता उठणार असल्याने कायमची जास्त खराब होण्याची समस्या सुटणार आहे यामुळे या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी सीमाताई हिरे यांनी सर्व नागरिकांचे आणि स्थानिक नेतृत्वाचे आभार मानत, या प्रकल्पामुळे परिसरात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी आमदार सीमाताई हिरे,राहुलजी ढिकले,शहराध्यक्ष प्रशांत जाधव,प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी,महेश हिरे,प्रदीप पेशकर,विजय साने,सुनील केदार,माजी नगरसेविका अलका आहिरे,सुवर्णा मटाले,छाया देवांग,भाग्यश्री ढोमसे,कावेरी घुगे,माधुरी बोलकर,हर्षदा गायकर,नगरसेवक राकेश दोंदे,भगवान दोंदे,सतीश सोनवणे,रामहरी संभेराव,सोनाली ठाकरे,रवी पाटील,अविनाश पाटील,भगवान काकड,कैलास अहिरे,रवींद्र जोशी,राजपूत सर,अशोक पवार,वैभव महाले,राकेश ढोमसे,अर्चना दिंडोरकर,मोहिनी पवार,हर्षदा देवरे,मोरानकर ताई,दिपाली देवरे,विद्या शेळके,कोमल महाले,अनिल मटाले,गौरव बोडके,विनय मोगल,सुरेश गंगुर्डे,विलास सानप,शरद फडोळ,श्रीकृष्ण कुलकर्णी,अविनाश नेरे,रश्मी हिरे-बेंडाळे,आदित्य दोंदे,रोहन काणकाटे,निखिल पाटील उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे