ब्रेकिंग
इगतपुरीच्या आंबेवाडी गाडीत मिळाला अर्धवट जळालेला मृत्यू देह.
नाशिक जनमत. इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी परिसरामध्ये उभे असलेल्या गाडी मध्ये जळालेल्या अवस्थेत मृत्यू देह मिळून आला असून मृत्यू देहाची ओळख पटलेली नाही मृत्यू देह हा पुरुषाचा की स्री चां याबाबत अजून तपास झालेला नाही इगतपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यु देह उत्तर तपासणीसाठी नेलेला आहे इगतपुरी पोलीस तपास करत आहे. मागे देखील अशीच घटना नाशिक इगतपुरी रोडवरील वेल्लोळी परिसरात घडली होती. या घटनेमुळे आंबेवाडी परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.