आरोग्य व शिक्षण
राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरतीसाठी मेळाव्याचे आयोजन..
- दिनांक: 7 जून, 2022
*राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरतीसाठी मेळाव्याचे आयोजन*
नाशिक जनमत *नाशिक, दिनांक: 7 जून, 2022(
येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 13 जून 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे वरिष्ठ सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार आर. एस.सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवार या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. उत्तीर्ण उमेवारांना आयोजित मेळाव्यात अप्रेंटिसशिप नियुक्तीची संधी आहे. तरी इच्छुक उमेवारांनी शैक्षणिक कागदपत्रांच्या मूळ व छायांकीत प्रतींसह नियोजित वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहनही वरिष्ठ सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार आर. एस.सोनवणे यांनी केले आहे.