मुलाचा वाढदिवस साजरा करायला गेले आणि घरातून 25 तोले सोने चोरांनी केले लपास.
नाशिक जनमत. प्रतिनिधी सिडको. मुलाच्या वाढदिवसाला बाहेरगावी जाणे कुटुंबाला महाग पडले आहे.. सिडकोतील डीजीपी नगर दोन कडून केवळ पार्क कडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुकृपा हा बंगला असून त्यामध्ये सिताराम रामदास शर्मा हे राहत होते. दरम्यान शर्मा हे मुलाच्या वाढदिवसासाठी बाहेरगावी गेले असता रात्री अडीचच्या सुमारास चार चाकी वाहनातून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडील कोंडा तोडून बंगल्यात प्रवेश केला लोखंडी कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या चेन अंगठी मंगळसूत्र असं 25 तोळ्याचे सोन्याचे दागिने व एक किलो चांदीचे विविध दागिने असा त्यांनी मुदेमाल लबवला . सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये काय झाला असून अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चोरीच्या घटनांमध्ये अंबड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रात्रीची पोलिसांनी गस्त वाढवणे महत्त्वाचे झाले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात काम करणारी महिला आल्याने तिच्या ध्यानात हा प्रकार आला. दरम्यान घटनास्थळावर पोलिसांनी पंचनामा करत सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू केला आहे. पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह अंबड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळावर दाखल झाले होते.