मच्छीमारांनी केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेचा लाभ घ्यावा. केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार.
दि. 22 ऑगस्ट, 2022
*मच्छिमारांनी केंद्र व राज्यपुरस्कृत योजनांचा लाभ घ्यावा*
*-केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार*
*नाशिक,दि.22 ऑगस्ट,2022
जिल्ह्यातील अदिवासी तसेच इतर मच्छिमारांनी यांनी केंद्र व राज्यपुरस्कृत योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केले.
नाशिक जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाच्या कार्यरत योजनांचा आढावा तसेच अंमलबजावणी करतांना येणाऱ्या अडीअडचणी व सुधारणाबाबत केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पवार यांच्या नाशिक येथील कार्यालयात चर्चा करण्यात आली, त्यावेळी डॉ.पवार बोलत होत्या. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प संचालक विकास मीना, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय प्रणिता चांदे, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पवन काळे, प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय सं. पां. वाटेगांवकर उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पवार यांनी यावेळी केंद्र व राज्य पुरस्कृत नीलक्रांती योजना, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना, जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सर्व योजना तसेच मत्स्यबीज उत्पादन, मत्स्यबीज केंद्र बळकटीकरण, पेसा अंतर्गत तलावांच्या विकास योजना, आदिवासी क्षेत्रातील मच्छिमारांकरिता विशेष योजना अंमलबजावणी बाबत आढावा घेतला. आवश्यक त्या ठिकाणी मत्स्यव्यवसाय विभाग तसेच संबंधित इतर यंत्रणेतील अधिकारी यांना सुध्दा सहकार्य करण्याबाबत सूचना यावेळी डॉ.पवार यांनी दिल्या.