ब्रेकिंग

घोटी येथे इगतपुरी तालुका भारती मीडिया फाउंडेशन ची बैठक संपन्न

*नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी तालुका भारतीय मीडीया फाउन्डेंशन ची आयोजित मिटींग संपन्न* नाशिक प्रतिनिधी :- ईगतपुरी तालुका कमेटीने दि 23/3/2022 रोजी मिटींग चे आयोजन केले होते या मिटींग मध्ये नविन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सम्मानीत करण्यांत आले व राज्यांतुन आलेल्या सर्व पदाधिकारी यांना हार गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व फाउन्डेंशन विषयी माहिती व पत्रकारीता कशी करावी या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच सभासदानी विचारलेल्या प्रश्नाना उत्तर देवुन समाधान करण्यात आले व राज्यांत लवकरच राज्य अधिवेशन घेण्यात येईल असे मिटींगचे प्रमुख अतिथी किसान मजदुर फोरम कमेटीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्यांचे मॅनेजिग प्रभारी वरिष्ठ पत्रकार मा. राजेंद्रजी वाघ यांनी बोलतांना सागितले या प्रसंगी मा. वाघ यांनी केंद्र व राज्य सरकार वर तासरे वोडले की सध्या सरकारचे लक्ष देशातील राज्यांतील शेतकरी, सैनिक, पत्रकार, व गोरगरीब जनते कडे नसुन फक्त पक्ष वाढवणे व एक मेकावर चिखल फेक करणे हा लाजिरवाणा धंदा सर्वच राजकीय नेते करत आहेत अशा देशासाठी विघातक सरकारच्या विरोधात भारतीय मीडीया फाउन्डेंशन लढा देत राहील हे त्यांनी सागितले पत्रकारानी आपले न्याय देण्याचे काम चोख पार पाडावे हे ही त्यांनी नमुद केले आपल्या संस्थेचे संस्थापक मा. ए. के. बिंदुसारजी पत्रकाराना योग्य न्यांय कसा मिळेल या मोठ्या ताकतीने लढा देत आहेत त्यांचे हात बळकट करण्यांसाठी सर्व देशातील पत्रकारानी आपले संघटन कसे वाढेल याची तयारी करावी असे ही त्यांनी सांगितले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्यांचे व्हाईस चेअरमन मा. जयरामजी धादवड, राज्यांचे वरिष्ठ उप अध्यक्ष मा. विजयजी साळवे. प्रदेश उप अध्यक्ष मा. दिलीपजी भोर. सागंली जिल्हा अध्यक्ष मा. दिपक सकटे. नाशिक जिल्हा अध्यक्ष मा. दिलीप बारगजे. अहमदनगर जिल्हा अध्यक्ष मा. सचिन मुतडक. सागंली जि.उप अध्यक्ष मा. वाघचौरे. पलुस ता.अध्यक्ष मा. किशोर चंदनशिवे. ताजगाव ता. अध्यक्ष मा. आरावडे. ईगतपुरी किसान मजदुर फोरम चे ता. अध्यक्ष मा. भास्कर वाजे.ईगतपुरी जनरल कमेटीचे ता. अध्यक्ष मा. योगेश लुटे. घोटी शहर अध्यक्ष मा. हितेश बांगर. घोटी शहर उप अध्यक्ष मा. धनजंय नागरे. घोटी शहर संघटक मा. कमलाकर तोकडे. घोटी शहर संपर्क प्रमुख मा. मंगेश कर्पे. कार्यक्रमाचे सुत्र संचालन मा. विजय कडलक यांनी केे आभार मा. दिलीप बारगजे यांनी मानले. *हितेश बांगर रिपोर्ट

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे