ब्रेकिंग

नासिक रोड येथील बिटको रुग्णालयात डॉक्टरला धक्काबुक्की, पोलिसाला मारहाण .

बिटको रुग्णालयात डॉक्टरला धक्काबुक्की, पोलिसाला मारहा

 

नाशिक जनमत   नाशिक शहरात उपचार करणारे डॉक्टर व पोलीस सुरक्षारक्षक देखील सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. काल नाशिक रोड येथील

बिटको रुग्णालयात रुग्णास भेटण्यास आलेल्या पाच संशयितांनी डॉक्टरला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. यावेळी भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पाच संशयितांसह महिलेच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि अंमलदार योगेश भगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री ११.४० वाजता बिटको रुग्णालयात कर्तव्यावर असतांना रुग्णालयात उपचाराकरिता आलेल्या

व्यक्तीसोबत सुंदरनगर परिसरातील संशयित वैभव डोळस, अर्पित साळवे, जय कुमावत, एक महिला रुग्णालयात आले. वैद्यकीय अधिकारी यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करत असतांना भगरे आणि पाटील सोडवण्यास गेले असता संशयितांनी पोलिस कर्मचारी, रुग्णालयाचे डॉक्टर, सुरक्षारक्षक यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. गुन्हे शोधपथक रुग्णालयात दाखल झाल्यानंतर संशयितांनी पथकातील कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की केली. वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांचे पथक तपास करत आहे. दरम्यान या घटनेमुळे बिटको रुग्णालयातील रुग्णांमध्ये घबराटीचे  वातावरण पसरले होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे