राजकिय

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर आल्याचा आनंद गारगोटी संग्रहालयने ने दुगुनित केला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी.

दिनांक: 9 एप्रिल 2022

 

*रोजच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर आल्याचा*

*आनंद गारगोटी संग्रहालयाने द्विगुणित केला*

*: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी*

 

*नाशिक, दि. 9 एप्रिल 2022

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे नाशिक जिल्ह्यात दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले आहेत. या दौऱ्या दरम्यान राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज सिन्नर येथील गारगोटी संग्रहालयास भेट देवून पाहणी केली. रोजच्या जीवनात माणसाला थोडा विरंगुळाही गरजेचा असतो. आज गारगोटी संग्रहालयाला दिलेल्या भेटीतून धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडल्याचा आनंद गारगोटी संग्रहालयाच्या भेटीने द्विगुणित केला, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

 

यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, तहसीलदार राहुल कोताडे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ तांबे, विजय सोनवणे, गारगोटी संग्रहालयाचे संस्थापक के. सी. पांडे, आदी उपस्थित होते.

 

या संग्रहालयाची सुंदरता बघून आज सांस्कृतिक उत्थानावर खऱ्या अर्थाने चर्चा करण्याची गरज असल्याची भावना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली. आज त्यांनी सिन्नर येथील गारगोटी संग्रहालयाच्या दोन्ही दालनातील गारगोटीतून साकारलेल्या वृक्षांच्या प्रतिकृती, देवदेवता व माहात्म्यांचे गारगोटी शिल्प, फुलदाणी यांची पाहणी केली. यानंतर गारगोटी संग्रहालयातील वरील दालनातील विक्री कक्षास सुद्धा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी भेट दिली. या दालनात गारगोटीपासून बनिवेले दागिने, शिल्प, शोभेच्या वस्तू व ब्रेसलेट, स्फटीकांपासून बनविलेल्या माळा विक्रीस ठेवलेल्या आहेत

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे