शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात लाभार्थ्यांनी शासनाकडून* *मिळालेल्या मदतीबाबत व्यक्त केल्या मन:पुर्वक भावना*

*’शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात लाभार्थ्यांनी शासनाकडून*
*मिळालेल्या मदतीबाबत व्यक्त केल्या मन:पुर्वक भावना*
*नाशिक, दि.17 जूलै 2023 (नाशिक जनमत वृत्तसेवा):*
शासनाच्या कल्याणकारी योजनांचा वेगवान अंमलबजावणीच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत लाभ पोहचत आहे. या शासकीय मदतीतून लाभार्थ्यांना उभारी मिळाली असून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. ‘शासन आपल्या दारी’ नाशिक जिल्हास्तरीय कार्यक्रमात आलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
*मत्सविक्री व्यवसायाला मिळाली ऑटोरिक्षा व शीतपेटीची जोड:- गोकूळ लिलके, आळंदी डॅम, रवळगाव, तालुका दिंडोरी*.
भाई बंदरकर मच्छीमार संस्थेचा सभासद असलेले गोकूळ दत्तु लिलके राहणार आळंदी डॅम, रवळगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक हे मासे विक्रीचा व्यवसाय करतात. मला सहाय्यक आयुक्त, मत्सव्यवसाय यांच्यामार्फत मानव विकास कार्यक्रम 2022-23 अंतर्गत मासे विक्री व्यवसायासाठी बजाज कंपनीची तीनचाकी ऑटोरिक्षा शीतपेटीसह मिळाली आहे. याआधी मी साध्या ट्रेमध्ये मासेविक्री करीत होतो परंतु आता ऑटोरिक्षा व शितपेटीच्या माध्यामातून गावोगावी ग्राहकांना वेळेत ताजा माल विक्री करू शकतो. त्यामुळे माझे नुकसान होत नसून उत्पन्न देखील वाढले आहे. मी शासनाचा मन:पूर्वक आभारी असल्याचे गोकूळ लिलके यांनी सांगितले.
*दिपकच्या आईने व्यक्ती केली शासनाप्रती कृतज्ञता: दिपक अरूण भारद्वाज, सातपूर, नाशिक*
माझा मुलगा दिपक अरूण भारद्वाज हा मतिमंद आहे. याला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्यामार्फत स्वावलंबन कार्ड योजना अंतर्गत UDID कार्ड प्राप्त झाले आहे. मतिमंद मुलांसाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ माझ्या मुलाला या कार्डमुळे मिळणार असून मी मुलासोबत बस व रेल्वेतून प्रवास करू शकणार आहे. माझ्या मुलाला हा लाभ मिळाल्याबद्दल मी शासनाचे आभार मानते या शब्दात दिपकच्या आईने शासनाप्रती कृतज्ञता व्यक्ती केली.
*दिव्यांग विद्यार्थींनींना मिळाले श्रवणयंत्र, शिक्षकांनी मानले शासनाचे आभार : किर्ती भगवान भगत व मानसी प्रमोद वाणी*
किर्ती भगवान भगत राहणार इगतपुरी जिल्हा नाशिक व मानसी प्रमोद वाणी, राहणार चाळीसगाव या दोन्ही विद्यार्थींनी अमर बहीलाल छाजेड, जागृती श्रवणविकास विद्यालय, मलखमालबाद नाशिक या विद्यालयात शिकतात. दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत जिल्ह्यात सुरू असलेल्या दिव्यांग शाळांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सहाय्यक अनुदानातून लाभ दिला जातो. या दोन्ही विद्यार्थीनींना श्रवणयंत्राचा लाभ मिळाल्यामुळे त्या ऐकू शकणार आहेत अशा आनंदाची भावना शिक्षिका सविता पंडीत यांनी व्यक्त करून विद्यार्थिनींच्या वतीने शासनाचे आभार मानले आहे.
*वीटभट्टी व्यवसायातून साधली आर्थिक उन्नती: मोहन गांगुर्डे राहणार पालखेड बंधारा ता.दिंडोरी जिल्हा नाशिक*
माझे नाव मोहन गांगुर्डे राहणार पालखेड बंधारा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक. मला आदिवासी विकास विभागामार्फत न्युक्लियस बजेट अंतर्गत वीटभट्टी व्यवसायासाठी अनुदान प्राप्त झाले आहे. या व्यवसायातून माझी आर्थिक उन्नती झाली असून मी शासनाचा व माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आभारी असल्याची भावना मोहन गांगुर्डे यांनी व्यक्त केली.
*दुचाकी व शीतपेटीमुळे ताजे मासे ग्राहकांपर्यंत पोहचविणे झाले शक्य: समाधान बन्सी जाधव राहणार नांदगाव बुद्रुक, तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक*
दारणा डॅम मच्छिमार सोसायटी नांदगावचा सभासद असलेले समाधान बन्सी जाधव राहणार नांदगाव बुद्रुक, तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक हे पूर्वी सायकलवर गावातच मासे विक्री करायचे. मला सहाय्यक आयुक्त, मत्सव्यवसाय यांच्यामार्फत मानव विकास कार्यक्रम 2022-23 अंतर्गत मासे विक्री व्यवसायासाठी टिव्हीएस कंपनीची दुचाकी शीतपेटीसह मिळाली आहे. आता दुचाकीच्या सहाय्याने मला चार गावी जाऊन ताजे मासे विक्री करणे शक्य झाले आहे. मी मत्सव्यवसाय विभाग व शासनाचा ऋणी असल्याची भावना समाधान जाधव यांनी व्यक्त केली आहे.
*तीनचाकीने दिली आयुष्याला गती :- दादा मोरे*
नाशिक जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कृत्रिम अवयव व सहायभूत साधने वाटप योजनेंतर्गत साधने दिली जातात. मला तीनचाकी सायकल व वैश्विक ओळखपत्राचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे माझे जीवन सुकर झाले असून आयुष्याला गती मिळाल्याचा आनंद होतोय, अशी भावना नाशिक येथील गंगापूरचे दादा सदाशिव मोरे यांनी व्यक्त करुन शासनाचे आभार मानले.
*भाजीपाला व्यवसायाने दिली उभारी :- अनिता आव्हाड*
प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत स्वनिधी योजनेमधून भाजीपाला या व्यवसायासाठी मला 20 हजार इतक्या रकमचे कर्ज मिळाले. या भाजीपाला व्यवसायाने मला उभारी मिळाली आहे. त्यामुळे मला व माझ्या कुंटूबाला आधार मिळाला, अशा प्रतिक्रिया नाशिक येथील अनिता आव्हाड यांनी व्यक्त करुन शासनाचे आभार मानले.
*शासनाच्या योजनेने दिले बळ :- करुणा निकम*
प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत स्वनिधी योजनेमधून कटलरी या व्यवसायासाठी मला 20 हजार इतक्या रकमचे कर्जाचा लाभ घेतला आहे. या कटलरी व्यवसायाने मला व माझ्या कुंटूबाला आधार मिळाला, अशा भावना नाशिक येथील करुणा निकम यांनी व्यक्त केल्या व शासनाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
*शासनाच्या जीवनोन्नतीने दिली संजीवनी :- निशा टिळे*
गरीब कुटूंबाना शाश्वत उपजीवकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढण्यासाठी शासनाकडून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती योजना राबविली जाते. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना विविध बँकेमार्फत किफायत व्याज दराने दिले जाते. तसेच रोजगार उपलब्ध
होण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण् दिले जाते. शासनाच्या जीवनोन्नती योजनेच्या माध्यमातून मी आर्ट क्राफ्ट प्रशिक्षण घेतले व त्यातून विविध कलात्मक वस्तू तयार केल्या जातात. त्यामुळे मला या योजनेमुळे संजीवनी मिळाली आहे, असे मोहगाव, ता.जि.नाशिक येथील निशा टिळे यांनी सांगितले.