आरोग्य व शिक्षण
दिव्यांग विद्यार्थ्यांनी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करावे* *: योगेश पाटील*
*दिव्यांग विद्यार्थ्यांनी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करावे*
*: योगेश पाटील*
*नाशिक, दिनांक २० जून २०२३ (जिमाका वृत्तसेवा):*
जिल्ह्यातील शालांत परीक्षोत्तर शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेच्या 2022-23 या वर्षातील लाभासाठी ३० जून २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी mahadbt या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे.
या योजनेचा 2021-2022 साठी लाभ घेण्याकरीता पुन्हा अर्ज (Reapply) करण्यासाठी देखील ३० जून २०२३ पर्यंत शासनस्तरावरून मुदतवाढ देण्यात आली असल्याचेही जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी कळविले आहे.