शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत* *शिल्प निदेशक हंगामी पदासाठी 13 एप्रिलला होणार मुलाखत* *: संजय कुटे*
वृत्त क्र. 81 दिनांक: 11 एप्रिल 2023
*शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत*
*शिल्प निदेशक हंगामी पदासाठी 13 एप्रिलला होणार मुलाखत*
*: संजय कुटे*
*नाशिक, दिनांक 11 एप्रिल, 2023 (जिमाका वृत्तसेवा):*
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिन्नर येथे तासिका तत्वावर आणि निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात असलेल्या विविध ट्रेडकरिता शिल्प निदेशक या पदासाठी गुरूवार 13 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता मुलाखतीचे आयोजन केले आहे. इच्छुकांनी त्यांच्या मुळ प्रमाणपत्र व त्यांच्या छायांकीत प्रतींसह उपस्थित रहावे, असे आवाहन सिन्नर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय कुटे यांनी केले आहे.
या संस्थेत जोडारी (फिटर) 1 पद, पत्रेकरागिर 1 पद, यांत्रिक मोटार गाडी 1 पद, संधाता 1 पद, गणित चित्रकला निदेशक 1 पद अशी एकूण तासिक तत्वावर असलेल्या 5 पदाकरिता मुलाखतीचे आयोजन केले आहे. प्रथम 4 पदांसाठी उमेदवार संबंधित व्यवसायातील आय.टी.आय, एन.सी. व्हि.टी परिक्षा उत्तीर्ण व सि.आय.टी.एस उत्तर्णी असावा अथवा यंत्र अभियांत्रिकी (मॅकेनिकल) पदवी अथवा पदविका किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण आणि संबंधित क्षेत्रातील शिकविण्याचा व प्रशिक्षणाचा 4 वर्षांचा अनुवभव असणे आवश्यक आहे.
गणित चित्रकला निदेशक पदाकरिता यंत्र अभियांत्रिकी (मॅकेनिकल)/ विद्युत अभियांत्रिकी पदवी अथवा पदविका किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रात शिकवण्याचा व प्रशिक्षणाचा चार वर्षांचा अनुभव असावा. तासिका तत्वाच्या नियमानुसार वेतन असणार आहे. यासंबंधित अधिक माहितीसाठी प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवी मंदिर रोड, सिन्नर येथे 02551-221295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्राचार्य श्री. कुटे यांनी कळविले आहे