नासिक मधील सिडकोत राहणाऱ्या मित्राचा मित्रानेच केला खून.

नाशिक जनमत. नाशिक शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून युवकांना पोलिसांचा धाक नसल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कारणावरून ही खुनापर्यंत मजल वाढलेले आहे. अशीच घटना काल रात्री घडली आहे.
एकलहरे परिसरातील किर्लोस्कर कंपनी जवळ एका युवकाचा रक्तबंबळ अवस्थेत मृत्यू देह मिळून आला होता. नाशिक रोड पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत तपास नाशिक शहरातील सिडको पर्यंत लागला .मृत्यू देह हा चेतन ठमके याचा असल्याचा संशय पोलिसांना आला अधिक तपास केला असता चेतन ठम्केचा मिळून आला. त्याच्या घरी तपास केला असता वडिलांनी सांगितले की काल रात्री अकरा वाजेच्या दरम्यान त्याचे मित्र पंकज अहिरे आणि अशीश भारद्वाज या दोघांनी घरी येऊन चैतन्य बाहेर घेऊन गेले. दरम्यान रात्री वडिलांनी दीड वाजता फोन केला असता मित्रांचे व त्याचे फोन बंद असल्याचे समजले. नासिक रोड पोलिसांनी फोन करून त्यांना कळवले की तुमच्या मुलाचा खून झाला आहे. अशी माहिती पोलिसांनी ठमके परिवाराला दिली.
दरम्यान शिवजयंतीच्या पूर्वसंध्याला घटना घडल्याने शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान. ही घटना शिवजयंती चे पोस्टर लावण्यावरून वाद झाल्याची माहिती मिळत आहे उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे दोघांनी शास्त्राने वार करीत मारण्याचा संशय व्यक्त केला श्वान पथकाने रक्ताचा मार काढला असता तरुण जीव वाचवण्यासाठी पळत असल्याची दिसून आले आनेक ठिकाणी रक्त सांडले होते. कुणाच्या घटनेने नाशिक शहर हदरले असून नाशिक शहरामध्ये चार चाकी वाहने फोडणे कोयता गॅंग चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून पोलिसांनी गस्त वाढावी. अशी मागणी ज्येष्ठ नागरिक करत आहे.