आरोग्य व शिक्षणब्रेकिंग
नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट,
नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट, आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेण्यामागील कारण काय.नाशिककरांवर यंदाच्या वर्षी पाणी कपातीचे संकट आहे. यामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून पाणी कपात केली जाणार आहे. त्यात महत्वाची बाब म्हणजे दर महिन्याला आठवड्यातील एक दिवस अधिकची कपात केली जाणार आहे..धरणांचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख संपूर्ण राज्यात आहे. सर्वाधिक धरणे आणि पाणीसाठा हा नाशिकमध्ये होत असतो. त्यात महत्वाची बाब म्हणजे मुंबईसह मराठ वाड्यात देखील नाशिकमधील धरणातून पाणी दिले जाते. त्यामुळे नाशिकला मुबलक पाणीसाठा असतो. त्यामुळे शक्यतोवर नाशिककरांवर पाणीबाणीची वेळ येत नाही. मात्र, यंदाच्या वर्षी पाणीकपातीचा निर्णय नाशिक महानगर पालिकेने घेतला असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी आठवड्यातील एक दिवस नाशिकमध्ये पालिकेकडून केला जाणारा पाणी पुरवठा केला जाणार नाहीये. त्यामागील कारण म्हणजे धरणातील पाणी साठा नसून पावसाळा लांबण्याची शक्यता आहे,यंदाच्या वर्षी जून मध्ये पडणारा पाऊस यंदाच्या वर्षी उशिरा पडू शकतो असं जाणकारांचे मत आहे. त्याचे कारण म्हणजे पॅसिफिक समुद्रात अल निनो वादळ येणारअसल्याची माहिती आहे. आणि त्यामुळे जून महिण्यात येणारा पहिल्या पावसाच्या सरी उशिरा दाखल होणार आहे.याच संपूर्ण पार्श्वभूमीवर नाशिक महानगर पालिकेकडून केला जाणारा पाणीपुरवठा आठवड्यातील एक दिवस बंद केला जाणार आहे. जुलै पर्यन्त जरी पाऊस पडला नाहीतरी नाशिककरांना पाणी पुरेल इतका पाणीसाठा आहे. मात्र, पावसाळा लांबणीवर गेल्यास परिस्थिती बदलू शकते.नाशिक महानगर पालिकेत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थित पाण्याच्या संदर्भात बैठक झाली होती. त्यामध्ये सर्व बाजूने माहिती घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कदाचित पाऊस जून महिण्यात पडला नाहीतर त्यावेळी पाणीकपात करण्यापेक्षा आधीच दोन महीने पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे.