नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे ऑनलाईन ग्रामसभेचे आयोजन
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर कमी नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण आणि ऑनलाईन ग्रामसभेचे आयोजन
नाशिक जनमत अरुण हिंगमिरे जातेगाव नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथे कोरोणाच्या पार्श्वभूमीवर दि.२६ प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने येथील ग्रामपालीकेच्या प्रांगणात सकाळी ७.३० वाजता मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत सरपंच शांताबाई पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी नांदगाव पंचायत समितीच्या उपसभापती सौ.मधुबाला खिरडकर, उपसरपंच पंढरीनाथ वर्पे, सदस्य रामदास पाटील, बाळासाहेब लाठे, संदिप पवार, ग्रामविकास अधिकारी शरद मोहिते, तसेच सर्व महिला सदस्य व सामाजिक कार्यकर्ते, माजी पदाधिकारी आशा सेविका, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपालीकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाईन ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.प्रत्येक वेळी ग्रामसभा म्हटल्यावर अती उत्साही मंडळी नेहमीप्रमाणे गावच्या विकासभिमुख प्रश्न मांडण्यापेक्षा इतर विषय मांडत असल्याने गोंधळ निर्माण होत होता. परंतु पहिल्यांदा
ऑनलाईन ग्रामसभेचे आयोजन हा उपक्रम राबविण्यात आल्याने गावातील ठराविकच तरुणांनी ग्रामसभेत आपला सहभाग नोंदवला असल्याने गावातील अतिषय योग्य समस्या तरुणांनी मांडल्या असल्याचे शरद मोहिते यांनी सांगितले.