शहरातील 35 अंध व्यक्तींना मिळाला* *अंत्योदय शिधापत्रिकेचा लाभ*:गणेश जाधव
M
*शहरातील 35 अंध व्यक्तींना मिळाला*
*अंत्योदय शिधापत्रिकेचा लाभ*
- *:गणेश जाधव*
*नाशिक, दिनांक: 10 ऑक्टोबर, 2023 नाशिक जनमत वृत्तसेवा):*
शहरात रविवार 8 ऑक्टोबर 2023 रोजी के.टी.एच.एम कॉलेज,गंगापुर रोड नाशिक येथे उपायुक्त (पुरवठा) प्रज्ञा बडे यांच्या पुढाकारातून अंध व्यक्तींना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित शिबीरात 35 अंध दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले. अशी माहिती धान्य वितरण अधिकारी तथा तहसिलदार नाशिक गणेश जाधव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
आयोजित शिबीरात साई हार्ट केअर सेंटरचे संचालक डॉ. अनिरूद्ध धर्माधिकारी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच नायब तहसिलदार दिलीप सावळे, पुरवठा निरिक्षक शांताराम मोंढे, विलास कनोजे, दिपाली घुगे, नितिन गायकवाड, मंदा खैरे, ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड ॲण्ड डिसेबल्ड या सेवाभावी संस्थेचे श्री. शेजवळ उपस्थित होते.
शिबीराचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्ती शासनाच्या शिधापत्रिका व धान्याचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात येण्याएवजी दिव्यांगापर्यंत पोहचून त्यांना लाभ प्रदान करणे हा होता. त्या अनुषंगाने 35 अंध दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय शिधापत्रिका वितरीत करून त्यांची तात्काळ डेटा एन्ट्रीही यावेळी करण्यात आली. शहरातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह धान्य वितरण अधिकारी कार्यालय नाशिकरोड येथे संपर्क साधून त्वरीत अंत्योदय योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे