झारखंड च्या देवघर मध्ये त्रिकूट पर्वतावर रोपवे.अपघात. तीन जणांचा मृत्यू.. सैनिकांन तर्फे रेस्क्यू ऑपरेशन.
नाशिक जनमत झारखंडमधील देवघर येत रविवारी राम नवमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक त्रिकूट पर्वतावर जाण्यासाठी आले होते यावेळी रोपवे ने हे पर्यटक जात असताना एक ट्रॉली दुसऱ्या ट्रॉलीवर आदळल्याने अपघात झाल्याचे माहिती समोर येत आहे. यामध्ये 48 पर्यटक रविवारी दुपारी चार वाजेपासून अडकलेले होते रात्र झाल्याने मदत कार्यात अडचण आली त्यामुळे रात्रभर उपाशीच पर्यटकांना रात्र काढावी लागली दरम्यान घटनेमध्ये आत्तापर्यंत तीन जणांचा मृत्यू झालेला आहे अजूनही सेना दलातर्फे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. आत्ताच आलेल्या बातमीनुसार अजूनही सहा जण रुपयामध्ये अडकलेले आहेत यात लहान मुले देखील होती आत्ताच एका लहान मुलाला वाचवण्यात सेनेला यश आले आहे पर्यटकांना अन्न पाणी सुविधा हेलिकॉप्टरद्वारे पुरवण्यात येत आहे गेल्या छत्तीस तासापासून ऑपरेशन चालू आहे लवकरात लवकर अडकलेल्या पर्यटकांना देखील सुखरूप खाली उतरवण्यात येईल असे सांगण्यात येत आहे भारतातील सर्वात उंच असा हा रोपे असून हा सरळ उंच आहे घटनास्थळावर डॉक्टर सैनिक व स्थानिक नागरिक मदत करत आहे आत्तापर्यंत 41 पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे वर आकाश खाली दरी आणि मध्ये जीवन सध्या अडकलेले आहे अतिशय गंभीर अशी परिस्थिती देवघर येथे आहे रामनवमी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी आलेले होते घटना कशी झाली व का झाली याचा तपास चालू आहे