झोपडीत झोपलेल्या वृद्ध महिलेला ओढून बिबट्याने घोटाळा गळा. नागरिकांमध्ये दहशत.
नाशिक जनमत . इगतपुरी तालुक्यातील चिंचखेड येथे शनिवारी रात्री आदिवासी महिला आपल्या झोपडीत एकटीच झोपली असताना बिबट्याने तिला ओढून नेत ठार केले परिसरात बिबट्याचे हल्ले वाढत असून यावेळी तर थेट घरात शिरुन त्याने हल्ला केल्याने नागरिकांत दहशत निर्माण झालेले आहे दरम्यान नागरिकांतर्फे वन विभागास दोष सध्या नागरिक देत आहे कारण की नाशिक जिल्ह्यामध्ये व इतर अनेक ठिकाणी पकडलेले बिबटे हे इगतपुरी तालुक्यातील अनेक भागात सोडत असल्याने इगतपुरी तालुक्यामध्ये त्रंबक इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांची संख्या वाढलेली आहे त्यातून महिना पंधरा दिवसात अशा घटना आता कायमचा झालेले आहे त्यामुळे ग्रामीण भाग पूर्णपणे दहशतीखाली आहे. इगतपुरी येथील घाटनदेवी मंदिराच्या बाजूने चिचले खैरे गावाकडे रस्ता जातो तेथे गावठाण भागात 55 वर्षीय शकुंतला अमृत रेरे ही महिला मळ्यात शेळ्याचे राखण करण्यासाठी शनिवारी रात्री झोपडीत झोपल्या होत्या उन्हाळा सुरू असल्यामुळे गरम होत होते त्यामुळे त्यांनी झोपडीचा दरवाजा उघडा ठेवला होत रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान बिबट्या शिकार शोधत होता.समोर असलेला झोपडीत बिबट्या शिरला व झोपलेल्या महिलेवर त्यांनी हल्ला करत तिचा गळा जबड्यात पकडून तिला पाचशे मीटर जंगलात नेले तिच्या पोटाच्या वर तोंडापर्यंत चा अर्धा भाग त्याने खाल्ला सकाळी घरच्यांनी शोध घेतल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचे समजले.पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली . सुरुवातीला मृत्यूदेह पाहून हा नेमका घातपात आहे की काय याबाबत पोलिस आणि नागरिक बुचकळ्यात पडले असल्याचे समोर आले. या महिलेला दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे. परिसरात तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली दरम्यान मृत्यू झालेल्यांमहिलांच्या वारसांना शासनाकडून 15 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी यांनी सांगितले दरम्यान आता जंगलातील शेळ्या गाय वगैरे सोडून आता व्यक्तींवर देखील हल्ले वाढले आहेत जिल्ह्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे व कायद्यानुसार बिबट्या हा सुरक्षित प्राण्यांमध्ये गणला जातो ते आपल्या उंचीच्या मापात शिकार शोधत असतो यामध्ये कुत्र्यांची संख्या अधिक असते परंतु वेळेनुसार बकरी वासरू लहान मुले गाय त्यानंतर आता तर मोठ्या व्यक्तीवर हल्ला झाल्याने नागरिकांची दहशत निर्माण झाली आहे ऑगस्ट महिन्यापासून सहा व्यक्तीवर हल्ले झाले आहे यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे परिसरात ऑगस्ट 2021 पासून बिबट्याचे हल्ले केले यामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला दरम्यान या घटनेने इगतपुरी तालुका मधील ग्रामीण भागातील नागरिक दहशतीखाली आहे