लघुलेखक व लघुटंकलेखक पदासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन माहिती दाखल करावी*
*लघुलेखक व लघुटंकलेखक पदासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन माहिती दाखल करावी*
*नाशिक दि.9 फेब्रुवारी, 2024 :*
नाशिक विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेच्या नाशिक विभागाच्यावतीने लघुलेखक व लघुटंकलेखक या पदाच्या व्यावसायिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी 11 फेब्रुवारी,2024 पर्यत ऑनलाईन माहिती दाखल करावी,असे आवाहन नाशिक विभागीय सहनिबंधक विलास गावडे यांनी केले आहे.
ही व्यावसायिक चाचणी मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेत होणार आहे. त्यानुसार उमेदवारांनी लॉगिन करून, टॅब्स ओपन करावा आणि आपल्या व्यावसायिक परीक्षेची भाषा व माध्यम नोंदवावे, असे आवाहनही श्री. गावडे यांनी केले आहे.
नासिक जनमत संपादक चंद्रकांत धात्रक बातमीसाठी संपर्क जाहिरातीसाठी संपर्क
9273020944.9834767771