शालेय मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले. पालकांमध्ये घबराट.
नाशिक जन्मत प्रतिनिधी नाशिक शहर व परिसरामध्ये तरुण शालेय विद्यार्थिनी सह तरुणी बेपत्ता होण्याच प्रमाण वाढले आहे
दिवाळी संपूर्ण दहा दिवस पूर्ण होत आहे परंतु या दहा दिवसा मध्ये नाशिक मध्ये 13 मुली बेपत्ता झालेले आहे यामुळे पालकांमध्ये घब्राड पसरले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींना फूस लावून गेले असल्याचे प्रकार घडले आहे.
पंचवटी परिसर एक आडगाव मध्ये तीन सरकार वाडा पोलीस हद्दीमध्ये एक म्हसरूळ पोलीस स्टेशन अंतर्गत तीन अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत एक सातपूर दोन व नाशिक रोड एक इंदिरानगर एक असे एकूण 13 अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे
सहाय्यक आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी सांगितले की अपहरणाच्या घटनेमध्ये मुलांचा शोध घेण्यासाठी अनंतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षा कडून तपास सुरू आहे काही मुलींची माहिती देखील मिळत आहे व पोलिसांतर्फे शोध चालू आहे
काही ठिकाणी घरातील आई वडील रागावल्याने मुली निघून गेल्याचे दिसून आले आहे.



