शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक 25 चे उमेदवार अनिल मटाले ना मतदारांचा पाठिंबा
नाशिक जन्मत शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार (प्रभाग क्रमांक 25 ) अनिल मटाले यांना प्रभाग क्रमांक 25 मधून मोठा प्रतिसाद लाभत आहे.
नगरसेवक म्हणून त्यांनी या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास केला होता त्यांना शिवसेना पक्षाने उमेदवारी दिली असून त्या उमेदवारीची संधी साधून प्रभागांमध्ये जलकुंभ पाणी रस्ते गुन्हेगारी मुक्त प्रभाग करायचा आहे. आपल्या ऑफिस शेजारीच त्यांनी प्रभागातील नागरिकांसाठी वाचनालय चालू केलेले आहे. अनेक सामाजिक कामात त्यांचे मोठे योगदान आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी विद्यार्थी सेनेचे देखील काम केलेले आहे.
त्रिमूर्ती चौक ते माऊली लॉन्स हा रस्ता ते नगरसेवक

असताना मंजूर करून डांबरीकरण व दुहेरी केला. अनेक विकासाची कामे केली. आपला प्रभाग हा आपला परिवार असून येणाऱ्या नागरिकांच्या समस्या ते नेहमी सोडत असतात.. नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रभागांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणण्याचा त्यांचा मानस आहे.
येणाऱ्या पंधरा तारखेस प्रभागातील नागरिकांनी धनुष्बाण निशाणीवर शिक्का मारून प्रभागातील मतदारांची सेवा करण्याची संधी द्यावी असे आव्हान त्यांनी प्रभागातील नागरिकांना केले आहे.
आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून पाच वाजता प्रचार बंद होणार आहे. प्रचार रॅलीमध्ये त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांचे आशीर्वाद घेतले समस्या जाणून घेतल्या व मी त्या समस्या सोडवण्यास तयार आहे असे त्यांनी यावेळेस मतदारांना सांगितले. त्यांचा विजय निश्चित असल्याचे प्रभागातील काही नागरिकांनी सांगितले.