प्रभाग क्रमांक 12 मध्ये डॉक्टर सौ हेमलता पाटील मोठ्या बहुमता सह संपूर्ण पॅनल होणार विजयी.
प्रभागात आणणार विकासाची गंगा.
>
नाशिक जनमत नासिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी प्रचार उद्या पाचवाजता संपत आहे . प्रचाराला मोठा वेग आला आहे.
प्रभाग क्रमांक 12 मधील राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून उमेदवार डॉक्टर सौ हेमलता निनाद पाटील ह्या घड्याळ या निशाणीवर उमेदवारी करत असून मतदारांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे
नासिक महानगरपालिकेत या नगरसेवक पदावर राहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांना संपूर्ण प्रभागाचा अभ्यास आहे आपल्या प्रभागात त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे
प्रभाग हाच आपला परिवार म्हणून त्या प्रभागातील मतदारांच्या सुखदुःखात सहभागी होतात. प्रभागातील मतदारांच्या समस्यासाठी ताबडतोब तत्पर असतात. वेळप्रसंगी त्या नाशिक महानगर पालिकेच्या महासभा स्टॅंडिंग सभेमध्ये अधिकाऱ्यांना धारेवर धरून आपल्या प्रभागातील मतदारांचे कामे लवकरात लवकर करून घेतात. प्रभाग क्रमांक 12 हा सुशिक्षित नागरिकांचा प्रभाव आहे. त्यामुळे प्रभागात काम करताना त्यांना मागे पाच वर्षे केलेल्या कामाचा मोठा अनुभव आहे. प्रभागाचा विकास हा त्यांना ध्यास आहे.

समाजसेवेचा वारसा असलेले लोकसंग्रहाची आवड.जोपसणारे संस्कृत व स्वच्छ चरित्राचे प्रभागाच्या विकासासाठी झटणारे व थोरामोठ्यांना आपल्याशी वाटणारे. संयम नम्रता शांतता असलेले मतदाराचे काय काम आहे हे ऐकून घेणारे व शांततेच्या मार्गाने चालणारे श्रीमंता पासून गरीबापर्यंत जात-पात न मांन् नारे असे व्यक्तिमत्व प्रभाग क्रमांक 12 मधील डॉक्टर्स हेमलता निनाद पाटील आहेत. मतदाराने केव्हाही फोन केला तरी तो उचलून मतदाराची समस्या आपल्या ऑफिस मधील कर्मचाऱ्यास सांगून ताबडतोब सोडवणारे वेलप्रसंगी मतदाराच्या घरी जाऊन खिशातून पैसे टाकून समस्या त्यांनी अनेकदा सोडवलेले आहे. आपला मुलगा व पती हे देखील त्यांचा कामामध्ये मदत करत असतात. प्रभागातील नागरिकांसाठी विकास करण्याचा त्यांचा ध्यास असून नागरिकांना स्वच्छ पाणी 24 तास लाईट चांगले रस्ते गुन्हेगारी मुक्त प्रभाग यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.

गुन्हेगारी मुक्त प्रभागासाठी मोठ्या प्रमाणात प्रभागातील चौकात चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. हेमलताताई ही प्रभागातील सर्वांची लाडकी बहीण लाडकी सून. लाडकी ताई आहे. दहा वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या नागरिक पर्यंत हेमलता ताईंच्या विजयासाठी प्रयत्न करत आहें. येणाऱ्या 15 तारखेस ताईंना भरघोस मतांनी आम्ही निवडून देऊ असे एका ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.
ताई जे बोलतात तेच करतात प्रभागाच्या विकासासाठी त्या सदैव कटिबंध आहेत असे त्यांनी नासिक जनमत जवळ बोलून दाखवले. प्रभागात निघालेल्या प्रचार रॅलीस मतदारांची मोठी गर्दी व पाठिंबा दिसून आला आहे. जनतेसाठी सदैव सज्ज हेमलता ताई पाटील आहेत. त्यांचा विजय पक्का असल्याचे मतदार बोलत आहे.